Jayant Patil on Pune Water Cut | पुण्यातील पाणी कपातीबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा खुलासा, म्हणाले… (VIDEO)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil on Pune Water Cut | मागील 2-3 दिवसांपासून पुणे शहरच्या पाणी कपातीच्या (Pune Water cut) संदर्भात उलट सुलट चर्चा सुरू आहेत. या संदर्भात बोलताना राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले की, अशा प्रकारची कुठलीही पाणी कपात करण्यात आलेली नाही किंवा राज्य सरकार (Maharashtra Government) अशा प्रकारच्या विचाराधीन नाही, असे सांगत सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पाण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. (Jayant Patil on Pune Water Cut)

 

पुण्यात पाणी कपात होणार असल्याच्या चर्चांच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे (Pune NCP) शहरातील प्रतिनिधींसोबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सिंचन भवन येथे आज (शनिवार) दुपारी चार वाजता बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर बोलताना याबाबत माहिती दिली. त्यावेळी जलसंपदा विभागाच्या एका कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या पत्राचा संदर्भ देऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. (Jayant Patil on Pune Water Cut)

 

 

 

 

या बैठकी दरम्यान पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार चेतन तुपे (MLA Chetan Tupe), आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre), विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ (Deepali Dhumal), जयदेव गायकवाड, रविंद्र माळवदकर, प्रदिप देशमुख आदी उपस्थित होते.

 

 

जयंत पाटील म्हणाले की, अश्या प्रकारची कुठलीही पाणी कपात करण्यात आलेले नाही किंवा राज्य सरकार अश्या प्रकारच्या विचाराधीन नाही. गेल्या 5 वर्षात फडणवीस सरकारच्या (Fadnavis Government) काळात देखील तब्बल 11 वेळा अश्या प्रकारचे पत्र जलसंपदा विभागाकडून महानगरपालिकेला पाठवण्यात आली होती. तसेच फडणवीस सरकारने एक महिना 180 MLC क्षमतेचा एक पंप बंद ठेवत पुणेकरांवर पाणी कपात लादली होती. आम्ही मात्र कुठल्याही प्रकारच्या पाणी कपातीचा निर्णय घेतलेला नसून पुणे (PMC) व पिंपरी चिंचवड (PCMC Pimpri Chinchwad) या महानगरांच्या भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता भविष्यात रिसायकलिंगद्वारे (recycling) तसेच पश्चिम घाटातील पाणी या महानगरांकडे वळवण्याच्या विचाराधीन असल्याचे पाटील यांनी सांगितले.

 

 

 

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले की,
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या 17 वर्षाच्या पालकमंत्री पदाच्या काळात कधीही पाणी कमी पडू दिले नाही,
परंतु केवळ अधिकारी स्तरावरील एका पत्राचा आधार घेत देवेंद्र फडणवीस पाण्याचे राजकारण करू पाहत आहे.
या शहराच्या पाणी व्यवस्थापनात नेहमीच अजित पवार यांनी पुणे शहराचा नव्याने होणारा विस्तार विचारात घेत पाणी व्यवस्थापन केले आहे.
एवढेच नाही तर या पाण्याव्यतिरिक्त भामा-आसखेड प्रकल्पातील 2.5 TMC पाणी अजित पवार यांच्यामुळे पुणे शहराला मिळाले.

 

 

गेल्या 5 वर्षांच्या काळात पुणेकरांनी मोठ्या विश्वासाने भाजपच्या (BJP) हातात महानगरपालिकेची सत्ता दिली.
मात्र देशात,राज्यात सत्ता असूनही फडणवीसांना पुणे शहरासाठी काहीही करता न आल्याने
पाणी प्रश्नाआडून महापालिकेचे राजकारण फडणवीस करू पाहत आहेत.
विशेष म्हणजे यात देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या एक दिवस अगोदर अश्या प्रकारचे पत्र बाहेर येणे हे सुद्धा संशयास्पद आहे.

 

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या या खुलाश्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol)
यांनी या प्रकरणातून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
खरं बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीच्या देश पातळीवरील नेत्यांपासून सर्वांची ‘खोटं बोल पण रेटून बोलं’
ही प्रवृत्ती असून पुणेकर या प्रवृत्तीला येत्या काळात निश्चितच धडा शिकवतील, असे प्रशांत जगताप म्हणाले.

 

Web Title :- Jayant Patil on Pune Water Cut | Water Resources Minister Jayant Patil’s revelation regarding water cut in Pune, said …

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा