श्री संत भगवानबाबांची 55 वी पुण्यतिथी शिरूर मध्ये उत्साहात साजरी

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – संत भगवानबाबांची 55वी पुण्यतिथी रविवारी (12 जानेवारी) शिरूर येथील निसर्ग गार्डन मंगल कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने प्राची पालवे यांची न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल सन्मानचिन्ह व भगवानबाबांची प्रतिमा देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ मार्गदर्शक कुटे सर होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस उपनिरीक्षक पालवे, डॉ.लाड, डॉ. साबळे, डॉ. हेमंत पालवे, सोसे सर, प्राचार्य चांगले सर, अॅड. रवींद्र खांडरे, शिरूर न. पा. चे नगरसेवक मंगेश खांडरे, नगरसेविका मनीषाताई कालेवार, धर्मेंद्र खांडरे व जेष्ठ मार्गदर्शक बापू सानप यांच्या हस्ते भगवानबाबा दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यानंतर ह. भ. प. हरिदास महाराज पालवे यांचे भगवानबाबांच्या चरित्रावर सुश्राव्य कीर्तन झाले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष शरदभाऊ कालेवार, व प्राध्या. वणवे सर यांनी पाठबळ दिले. सूत्रसंचालन प्राचार्य शिरसाट सर, दौंड सर व प्राध्या.दराडे सर यांनी केले. वाघ सर यांनी आभार मानले. महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like