‘कोरोना’मुळे जेजुरीतील मर्दानी दसरा यावर्षी रद्द !

जेजुरी – अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री खंडोबा मंदिरात यंदाचा नवरात्र व दसरा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने व परंपरेप्रमाणे साजरा होणार आहे . मात्र , श्रींचा पालखी सोहळा , खंड ( मर्दानी दसरा ) स्पर्धा , राज्यातून येणारे कलावंत व माघ्या मुरळी यांची हजेरी , दसरानिमित्त मानपान / रोख मानधन , भजन , पूजन , प्रसाद वाटप आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत , अशी माहिती देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी दिली .

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा- सात महिन्यांपासून मंदिर बंद आहे. तर नवरात्रो उत्सवाहतही ते बंद राहणार आहे, त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान मंदिरातील पुजारी , नित्य वारकरी , सेवेकरी व मानकरी यांच्या उपस्थितीत दैनंदिन पूजा व नवरात्र उत्सवातील पूजाअर्चा होणार असल्याचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी नमूद केले.