जेजुरी : कडेपठार पतसंस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाईन- (संदीप झगडे) : पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व कडेपठार पतसंस्थाचे अध्यक्ष माणिक झेंडे पाटील यांच्या माध्यमातून कोथळे गावातील गरीब व गरजू 30 कुटुंबाना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सध्या कोरोना व लॉकडाउन मुळे शेतकरी वर्ग अडचणीत आहे. शेतकरी अगदी मोजक्याच पिंकांचे उत्पादन घेत आहेत. शेतमालाला बाजार भाव नसल्याने व बाजारपेठा बंद असल्याने माल विक्रीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यातच या 30 कुटुंबांचा उदरनिर्वाह हा शेत मजुरी व शेती पूरक कामांमधून होत आहे.

कोरोना च्या संकटात शेतकऱ्यांच्या अडचणी मुळे मजुरांना देखील अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील 2 महिन्यापासून हाताला काम नसल्याने या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. या लोकांची अडचण लक्षात घेऊन कडेपठार पतसंस्थाच्या माध्यमातून या जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

याबाबाबत यावेळी माणिक झेंडे पाटील, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय भोईटे, पतसंस्थेचे संचालक राहुल भोसले, गावच्या उपसरपंच वंदना जगताप,माजी सरपंच वसंत जगताप, विश्वनाथ जगताप, तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद जगताप, माजी विध्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संदिप जगताप, शुभम जगताप, सुशील जगताप, अक्षय जगताप व ग्रामस्थ उपस्थित होते.