Jio च्या नव्या रिचार्जवर 300 % जास्त फायदे, ची घोषणा, जाणून घ्या नवीन ‘ऑल इन वन’ प्लॅन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कमी कालावधीत सर्वाधिक लोप्रियता आणि ग्राहक मिळवणाऱ्या रिलायन्स जिओ कंपनीने आपला ऑल इन वन नावाचा एक प्लॅन सुरु केला आहे. यामध्ये ग्राहकांना 300 % पेक्षा अधिक फायदा मिळणार असल्याची चर्चा सध्या आहे. १ डिसेंबर रोजी जिओने याबाबतची माहिती दिली होती.

टेलिकॉम जगतातील सर्वात स्वस्त हा प्लॅन असल्याचा दावा सध्या जिओने केला आहे. ६ डिसेंबर पासून हा प्लॅन सुरु होणार आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड जिओ टू जिओ सोबत अनेक सवलती देखील दिल्या जाणार आहेत. जाणून घेऊयात कसे असतील हे नवे प्लॅन.

1) 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना एक महिन्याची व्हॅलिडिटी मिळणार आहे. त्यासोबतच रोज 1.5 GB इंटरनेट डेटा, जिओ टू जिओ फ्री कॉलिंग आणि इतर नेटवर्कवर बोलण्यासाठी 1000 मिनिटे देण्यात येणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे एक महिना म्हणजे या ठिकाणी 28 दिवसांसाठी हा प्लॅन असेल.

2) 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज 1.5 GB इंटरनेट डेटा, जिओ टू जिओ फ्री कॉलिंग आणि इतर नेटवर्कवर बोलण्यासाठी 2000 मिनिटे देण्यात येणार आहेत आणि या प्लॅनची व्हॅलिडिटी ही दोन महिन्याचीअसणार आहे.

3) 555 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज 1.5 GB इंटरनेट डेटा, जिओ टू जिओ फ्री कॉलिंग आणि इतर नेटवर्कवर बोलण्यासाठी 3000 मिनिटे देण्यात येणार आहेत आणि या प्लॅनची व्हॅलिडिटी ही तीन महिन्याची असणार आहे.

4) जिओने आणखी एका नव्या प्लॅनची घोषणा केली आहे जो की संपूर्ण वर्षभरासाठी असेल 2199 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकाला प्रतिदिन 1.5GB इंटरनेट डेटा, जिओ टू जिओ फ्री कॉलिंग आणि इतर नेटवर्कवर बोलण्यासाठी 12,000 मिनिटे देण्यात येणार आहेत.