Jio नं आणला अ‍ॅड-ऑन डेटा प्लॅन ! फक्त 251 रुपयात मिळणार 50GB डेटा, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   रिलायन्स जिओने आपल्या उच्च डेटा व्हॉल्यूम वापरकर्त्यांसाठी नवीन अ‍ॅड-ऑन योजना बाजारात आणल्या आहेत. रिलायन्सने आपल्या नवीन वर्क फ्रॉम होम योजनेंतर्गत तीन नवीन डेटा अ‍ॅड-ऑन योजना सादर केल्या आहेत. या अ‍ॅड-ऑन योजनेनुसार ग्राहकांना 151 रुपयात 30GB डेटा, 201 रुपयांमध्ये 40GB आणि 251 रुपयात 50GB डेटा मिळेल. याशिवाय रिलायन्स जिओ 11 रुपयांना 0.8 जीबी डेटा, 21 रुपयांना 1 जीबी डेटा, 31 रुपयांना 2 जीबी डेटा, 51 रुपयांना 6 जीबी डेटा आणि 101 रुपयांना 12 जीबी डेटा ऑफर करते.

जिओने 1 वर्षाची वैधता असणारी योजना केली सुरू

अधिक डेटा आणि कॉलिंग बेनिफिटसह रिलायन्स जिओने शुक्रवारी नवीन वार्षिक योजना सुरू केली आहे. रिलायन्स जिओच्या नवीन योजनेचे उद्दिष्ट्ये म्हणजे वर्क-फ्रॉम-होम करणार्‍या लोकांना मदत करणे हे आहे. जिओच्या या योजनेची किंमत 2,399 रुपये ठेवण्यात आली आहे. 2,399 रुपयांच्या या योजनेत रिलायन्स जिओ वापरकर्त्यांना दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच अमर्यादित कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधादेखील पुरविल्या जातील. या योजनेची वैधता 365 दिवस असेल.

यासह जिओच्या 2121 रुपयांच्या योजनेसोबत ग्राहकांना 336 दिवसांची वैधता मिळेल. सोबतच अमर्यादित कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधादेखील देण्यात आल्या आहेत. जिओच्या या योजनेची वैधता 336 दिवस आहे.