दररोज 4GB पर्यंत डेटा आणि एकदम फ्री कॉलिंगचे बेस्ट प्लॅन, किंमत 300 पेक्षा कमी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होम मुळे वापरकर्ते जास्त प्लॅन्सच्या शोधात आहे. या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून भारतातील टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने खास डेटा प्लॅन आणले आहे. ज्यामध्ये रोज ४ जीबी पर्यंत डेटा सोबत फ्री कॉलिंग ऑफर केली जात आहे. या प्लॅनचे खास वैशिट्ये म्हणजे याची किंमत ३०० रुपयांपेक्षा कमी आहे.

व्होडाफोन-आयडियाचा २९९ रुपयांचा प्लॅन

व्होडाफोन-आयडियाने २८ दिवसांची वैधता असणार २९९ रुपयांचा जबरदस्त प्लॅन आणला आहे. त्यामध्ये रोज २ जीबी डेटा मिळत आहे. सध्या या प्लॅनमध्ये डबल डेटा ऑफर करण्यात येत आहे. आता हा प्लॅन रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना रोज ४ जीबी डेटा मिळत आहे. हा प्लॅन अनलिमिटेड फ्री कॉलिंग बेनिफिटसोबत येत आहे. तसेच यामध्ये रोज १०० फ्री एसएमएस मिळत आहेत.

एअरटेलचा २९८ रुपयांचा प्लॅन

हा प्लॅन २८ दिवसांच्या वैधतेसोबत प्राप्त होतो. यामध्ये रोज तुम्हाला २ जीबी डेटा मिळतो. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस ऑफर मिळते. या प्लॅनमध्ये एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम आणि विंक म्यूझिकचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. प्लॅनच्या सब्सक्रायबर्सला फास्ट टॅग खरेदीवर १५० रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.

रिलायन्स जीओचा २४९ रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जीओचा हा प्लॅन २८ दिवसांच्या वैधतेसोबत येतो. यामध्ये जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर नेटवर्कसाठी १०००० मिनिट्स मिळतात. तसेच रोज २ जीबी डेटा ऑफर केला जातो. यामध्ये रोज १०० फ्री एसएमएस सोबत प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like