Coronavirus : ‘कोरोना’ग्रस्त कनिका कपूरवर निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आले 3 FIR

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – गायिका कनिका कपूर वर कोरोना विषाणूबाबत दुर्लक्ष केल्याप्रकरणी तीन एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत. कोविड -१९ ने संक्रमित गायिका कनिका कपूरला तिच्या निष्काळजी वृत्तीमुळे नेटिझन्सचा सामना करावा लागत आहे, दुसरीकडे, नवीन अहवालांनुसार समोर आले आहे की तिच्यावर एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल तीन एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत. एका वृत्तानुसार, प्रथम एफआयआर लखनऊचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) नरेंद्र कुमार अग्रवाल यांनी दाखल केली आहे.

त्यांनी लखनऊ मधील सरोजिनी नगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कायद्याच्या कलम १८८, २६९ आणि २७० अन्वये एफआयआर दाखल केली आहे. यामध्ये कायदेशीर सुव्यवस्थेची अवज्ञा करणे, दुर्लक्ष करणे आणि कोणत्याही धोकादायक आणि जीवघेणा रोगाचा संसर्ग पसरवण्याची शक्यता यांचा समावेश आहे.

https://twitter.com/iNSAAjitDoval/status/1241559768897970176

लखनऊचे पोलिस उपायुक्त दिनेशकुमार सिंग यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आणि सांगितले की सीएमओच्या तक्रारीच्या आधारे कणिका कपूर यांच्यावर निष्काळजीपणाच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आली.

याशिवाय दुर्लक्ष केल्यामुळे कनिका कपूर वर आणखी दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. या वृत्तानुसार, एक एफआयआर हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये नोंदण्यात आली आहे तर दुसरी गोमती नगर पोलिस ठाण्यात नोंदण्यात आली आहे. दरम्यान, कनिकाने खुलासा केला की, रूग्णालयातील अधिकारी तिच्याशी चांगले वागत नाहीत. तसेच ती पुढे म्हणाले की अधिकारी तिच्यावर उपचार करत तर आहेत पण तिला योग्य भोजन मिळत नाही आणि तिच्या प्रकृतीकडे लक्ष देखील दिले जात नाही.

कनिका कपूर नुकतीच लंडनहून आली होती आणि ती मुंबईहून लखनऊलाही गेली होती. तिला कोरोनाची लागण झालेली आहे. याशिवाय तिने अनेक पार्ट्यांमध्ये भाग देखील घेतला आहे.