Kareena Kapoor-Amruta Arora | अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरोला कोरोनाची लागण

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Kareena Kapoor-Amruta Arora | जगभरात कोरोनानं विळखा घातला असून, पुन्हा नव्याने ही महामारी धुमाकूळ घालत आहे. नुकतंच बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि तिची खास मैत्रीण अमृता अरोरा (Amruta Arora) या दोघींनाही कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. दोघींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. (Kareena Kapoor-Amruta Arora)

करीना कपूरनं नुकतंच कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत आपल्या मैत्रिणींसोबत पार्टी केली होती. त्या पार्टीमध्ये तिच्या अनेक मित्र-मैत्रिणींचा सहभाग होता. गेल्या काही दिवसांपासून करीना आणि अमृता अनेक पार्ट्यांमध्ये उपस्थित होत्या. त्या दोघांचा रिपोर्ट(Corona Positive) पॉझिटिव्ह आला असल्याने, मुंबई महानगरपालिकेने या दोघांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना आरटीपीसीआर(RT-PCR) चाचण्या करण्याचं बंधनकारक केलं आहे. (Kareena Kapoor-Amruta Arora)

दरम्यान, करीना आणि अमृतासोबत पार्ट्यांमध्ये करिष्मा कपूर (Karishma kapoor), मलाईका अरोरा (Malaika Arora) यांचा देखील सहभाग होता. तसेच अलीकडेच अनिल कपूर (Anil Kapoor) यांची मुलगी रिया कपूरच्या घरी झालेल्या पार्टीमध्ये देखील या दोघींनी हजेरी लावली होती. तर या पार्ट्यांमध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज आणि आघाडीच्या कलाकार उपस्थित होते. या दोघींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे इंडस्ट्रीमध्ये जोरदार खळबळ उडाली आहे.

Web Title : Kareena Kapoor Amruta Arora | kareena kapoor amrita arora test corona positive both attaend many parties in bollywood

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Singer Charlie | ‘ही’ गायक झाली Oops Moment ची शिकार, अवॉर्ड फंक्शनमध्ये घसरला पूर्ण ड्रेस खाली; व्हिडिओ झाला तुफान व्हायरल

Nora Fatehi | पाण्यामध्ये झोपून नोरा फतेही झाली अजूनच ‘बोल्ड’; फोटो झाले व्हायरल

MHADA Exam | म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय ! जितेंद्र आव्हाड यांनी दिली माहिती

LIC Saral Pension Scheme | एका प्रीमियमवर आयुष्यभर पेन्शन ! जाणून घ्या योजनेचे पूर्ण कॅलक्युलेशन

Harnaaz Sandhu | Miss Universe 2021 ठरली भारतीय माॅडेल ‘हरनाज संधू’, सोशल मीडियावर जोरदार ‘ट्रेंड’ होतोय ‘Congratulations India’

Nawab Malik | ‘देवेंद्र फडणवीस टीका करतात तेव्हा चमत्कार घडतो, 2024 मध्ये देखील…’