भारतातील ‘या’ युवकानं तोडलं ‘विक्रम’वीर धावपटू उसेन बोल्टचं ‘रेकॉर्ड’, ट्विटर युजर्सनं केला ‘दावा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर कर्नाटकाच्या एका युवकाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्या युवकाने 100 मीटरची रेस केवळ 9.55 सेकंदांमध्ये पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे जगप्रसिद्ध एथलीट उसेन बोल्ट ने 100 मीटर रिले केवळ 9.58 सेकंदात पूर्ण करून वल्ड रेकॉर्ड केले होते. त्यावेळी हे रेकॉर्ड कोणीच तोडू शकत नाही असे म्हणले जात होते. परंतु या युवकाने हे रेकॉर्ड तोडल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

13.62 सेकंदात पूर्ण केले 142.5 मीटरचे अंतर
सोशल मीडियावर शेअर झालेल्या माहितीनुसार रेकॉर्ड बनवणाऱ्या युवकाचे नाव श्रीनिवास गोवड़ा असे आहे तो कर्नाटकाच्या मोडाबिद्री येथील रहिवासी आहे. श्रीनिवासन एक रेड्याच्या शर्यती दरम्यान हे रेकॉर्ड केले असल्याचे सांगितले जात आहे. ही रेस पाण्याने भरलेल्या शेतामध्ये आयोजित केली जाते. श्रीनिवासन यावेळी 13.62 सेकंदात 142.5 मीटरचे अंतर पूर्ण केले आहे. म्हणजेच त्याने शंभर मीटरचे अंतर केवळ 9.55 सेकंदात पूर्ण केले आहे.

ट्विटरवर रेसचा व्हिडीओ देखील व्हायरल
उसेन बोल्टने आपले रेकॉर्ड मोकळ्या मैदानावर बनवले होते मात्र या तरुणाने हे रेकॉर्ड पाण्याने भरलेल्या शेतामध्ये रेड्यासोबत पळून बनवले आहे. या रेसचा व्हिडीओ देखील काही लोकांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

जगातील सर्वात वेगवान धावपटू आहे उसेन बोल्ट
उसेन बोल्टला जगातील सर्वाधिक वेगवान धावपटू समजले जाते. बोल्टने रिलेच्या शर्यतींमध्ये वल्ड रेकॉर्ड बनवले आहे. तसेच यामध्ये देखील अकरा वेळा विश्व चॅम्पियन होण्याचे रेकॉर्ड आपल्या नावे केले आहे. त्यांनी ऑलिम्पिकमध्ये आठ मेडल देखील पटकावले आहेत. बोल्टने शंभर मीटर अंतर केवळ 9.58 सेकंदात पार करून वल्ड रेकॉर्ड बनवले होते. बोल्टने सध्या निवृत्ती घेतलेली आहे.

You might also like