Katraj Pune Crime | दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी भारती विद्यापीठ पोलिसांकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Katraj Pune Crime | दरोडा टाकण्याच्या तयारीत (In Preparation For Robbery) असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) अटक केली आहे. त्यांच्याकडून लोखंडी कोयता, मिरची पावडर, दोरी असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.16) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास कात्रज येथील एस.आर.ए. कॉलनी (SRA Colony Katraj) शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत करण्यात आली.

उदय महेश भोसले (वय-18 रा. एस.आर.ए. बिल्डींग, लेकटाऊन, कात्रज) याला अटक केली आहे. तर त्याच्या चार अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस हवालदार चेतन नारायण गोरे (वय-37) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींवर आयपीसी 399, 402 सह महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी उदय भोसले हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार (Criminals On Police Records) असून त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा (Attempt To Murder) गुन्हा दाखल आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी व कर्मचारी हद्दीमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी बातमीदारा मार्फत आरोपी बाबत माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी एस.आर.ए. कॉलनी शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत जाऊन पाहिले. त्यावेळी आरोपी दरोडा टाकण्यासाठी अंधारात लपून बसलेले दिसले.
पोलिसांनी छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, दरोडा टाकणार असल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून लोखंडी कोयता, मिरची पावडर, दोरी असा मुद्देमाल जप्त केला.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वर्षा तावडे (API Varsha Tayde) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjog Waghere On Shrirang Barne | संजोग वाघेरेंनी सोडले बारणेंवर टीकास्त्र, ”दहा वर्षात
एकही प्रकल्प नाही, कामगार, पर्यटन, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले…”

Murlidhar Mohol Meet Amit Raj Thackeray | पुण्यात मनसे नेते अमित ठाकरेंच्या भेटीनंतर
मुरलीधर मोहोळ म्हणाले – ‘आत्मविश्वास आणखी वाढला, विजय अधिक सोप्पा झाला’ (Videos)

Attack On Police Officer In Pune | पुण्यात पोलिसांवरील हल्ले सुरूच; भांडण सोडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली