7 वर्षांपूर्वी दुकानाचे नाव ठेवले होते ‘कोरोना; आता होतोय फायदा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोविड- 19 महामारीनंतर कोरोना हा शब्द लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच माहिती झाला आहे. जगभरात थैमान घातलेल्या या महामारीच्या 7 वर्षांआधीच केरळमधील एका व्यक्तीने आपल्या दुकानाचे नाव ‘कोरोना’ ठेवले (kerala-corona-store-opened-7-years-ago-kottayam) होते. पण हे दुकान आपल्या वस्तूंमुळे नाही तर नावामुळे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या सात वर्षांत जेवढे दुकान चर्चेत आले नव्हते तेवढे आता आले आहे.

कोट्टयमचे जॉर्ज या दुकानाचे मालक आहेत. त्यांनी सात वर्षांआधी या दुकानाचे नाव कोरोना ठेवले होते. पण त्यांना त्यावेळी जराही अंदाज नव्हता की, एक दिवस या नावाने जग घाबरेल आणि याच नावाने दुकान चर्चेत येईल. त्यांनी सांगितले की, कोरोना महामारीनंतर त्यांच्या दुकानात लोक जास्त येऊ लागले आहेत. जॉर्ज म्हणाले की, कोरोना हा एक लॅटीन शब्द आहे. ज्या अर्थ क्राउन (मुकूट) असा होतो. मी सात वर्षांपूर्वी माझ्या दुकानाचे हे नाव ठेवले होते. आता हे नाव व्यापारासाठी फायदेशीर ठरत आहे. या दुकानात तुम्हाला किचन, वॉर्डरोबचे सामान, प्लॉंट आणि पॉट मिळतील.