‘या’ श्रीलंकन बॉलरची आगळीवेगळी ‘ऍक्शन’ व्हायरल, बघून व्हाल ‘दंग’

वृत्तसंस्था : हा श्रीलंकन गोलंदाज अबु धाबी टी-10 लीग मध्ये बंगाल टायगर्ससाठी खेळत आहे. त्याच्या गोलंदाजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया वर धुमाकूळ घालत वायरल झाला आहे.

श्रीलंकेने आगळ्यावेगळ्या शैलीत गोलंदाजी करणारे अनेक गोलंदाज दिले आहेत. त्यात लसिथ मलिंगा हे एक मोठं नाव आहे. या गोलंदाजांच्या यादीत सध्याचे चर्चिले जाणारे नाव २१ वर्षाचा फिरकीपटू केविन कोथीगोडा याचे आहे. गॉल येथील राहणारे केविन चे कोच धमिका सुदर्शन यांनी त्याची तुलना दक्षिण आफ्रिकेचा पूर्व फिरकीपटू पॉल ऍडम्स सोबत केली आहे.

यावर केविन ने प्रतिक्रिया दिली असून त्याने कधीही ऍडम्स ला गोलंदाजी करताना पाहिले नाही आणि जेव्हा त्याची तुलना ऍडम्स सोबत करण्यात आली तेव्हा त्याने ऍडम्सच्या गोलंदाजीवर नजर टाकली.

केविन ने सांगितले कि, ‘सुरुवातीच्या काळापासूनच मी या पद्धतीने गोलंदाजी करत आहे. तसेच श्रीलंका मधील अंडर-१३, १५, १७ आणि १९ खेळत असताना देखील ऍक्शन मध्ये कुठलाही बदल केला नव्हता’.

केविन ने सांगितले कि, ‘सुरुवातीचे काही दिवस मी माझ्या वडिलांसोबत टेनिस बॉल ने खेळत होतो. आणि तेथूनच मी माझ्या बॉलिंग ऍक्शन ला चालना दिली’.

Visit : Policenama.com