आंबेडकर जयंती बंदोबस्तादरम्यान पिस्तूलासह सराईत जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हत्यारे बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केलं असून खडक पोलिसांनी एका सराईताला अटक केली आहे. त्याच्याकडून १ पिस्तूल २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

अजय दादू खुडे (वय. ३० वर्षे, रा. खराडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर शहरात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

खडक पोलिसांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बंदोबस्तासाठी गस्त सुरु होती. त्यावेळी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अजय दादू खुडे हा कंबरेला पिस्तूल लावून कासेवाडीतील धम्मपाल चौकात थांबला आहे. अशी माहिती पोलीस कर्मचारी रवि लोखंडे, विनोद जाधव आणि विशाल जाधव यांना बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला तेथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची अंगझडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे ३० हजार रुपये किंमतीचे १ गावठी पिस्तूल आणि ४०० रुपये किंमतीची २ जिवंत काड़तुसे मिळून आली. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करत पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगांवकर, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड, कर्मचारी विठ्ठल पाटील, विनोद जाधव, संदिप पाटील, आशिष चव्हाण, प्रमोद नेवसे, रवि लोखंडे, महावीर दावणे, समीर माळवदकर, बंटी कांबळे, राकेश क्षीरसागर, इम्रान नदाफ, योगेश जाधव, विशाल जाधव, हिम्मत होळकर यांच्या पथकाने केली.

You might also like