संगीताच्या ‘या’ जादूगारानं दिली अनेक ‘हिट’ गाणी, तरीही राहिली ‘ही’ कसर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – म्युझिक डायरेक्टर खय्याम इंडस्ट्रीत युनिक संगीत बनवण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक हिट सिनेमांसाठी गाणी दिली आहेत. नौशादप्रमाणेच खय्याम साहेबांनी आपल्या सिनेमांमध्ये शास्त्रीय संगीताचा अद्भुत वापर केला आहे. त्यांचं संगीत आजही चाहत्यांना खूप आवडतं. उमराव जान, बाजार, थोडी सी बेवफाई, रजिया सुल्तान, त्रिशुल आणि कभी कभी यांसारख्या अनेक सिनेमांसाठी त्यांनी धून दिल्या आहेत. आज त्यांच्या वाढिदिवसानिमित्त काही रोचक गोष्टी जाणून घेणार आहोत. खय्याम यांचं पूर्ण नाव मोहम्मद जहूर खय्याम आहे.

खय्याम यांचा c18 फेब्रुवारी 1927 रोजी पंजाबमधील राहोनमध्ये झाला होता. असं म्हटलं जात आहे की त्यांना आधी अ‍ॅक्टर व्हायचं होतं. त्यांनी काही काळ यासाठी प्रयत्नही केला. पंरतु यातून काहीही साध्य होऊ शकलं नाही. अशात त्यांना संगीतात रस येऊ लागला. शोला और शबनम हा तोच सिनेमा आहे ज्यानं खय्याम यांना इंडस्ट्रीत संगीतकार म्हणून ओळख दिली.

ज्या सिनेमांसाठी त्यांना म्युझिक डायेरक्टर म्हणून ओळखलं जातं त्यात उमराव जान सिनेमाचं नाव आधी येतं. असं म्हणतात की, या सिनेमाचं संगीत दिग्दर्शन करताना खूप घाबरलेले होते. याचं कारण म्हणजे त्याच्या आधी रिलीज झालेल्या पाकिजा आणि उमराव जान यांच्यात खूप समानता होती. पाकिजाचं संगीत आधीच सुपरहिट झालं होतं. त्यांना पाकिजापेक्षा काही वेगळं देण्याची गरज होती. खय्याम साहेबांनी एवढं शानदार म्युझिक देऊनही त्यांना इंडस्ट्रीत अशुभ मानलं जात होतं. एवढ्या लोकप्रिय ट्यून बनवल्यानंतरहीत त्यांचं संगीत कधीच सिल्वर जुबली करू शकलं नाही.

खय्याम यांच्याबद्दल यश चोपडा म्हणाले होते…

खय्याम यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, “यश चोपडांना एका फेमस मुव्हीचं म्युझिक माझ्याकडून करून हवं होतं. परंतु सगळेच त्यांना माझ्यासोबत काम करण्यासाठी मनाई करत होते. ते मला म्हणाले होते की, मला इंडस्ट्रीतले सर्व लोक म्हणत आहेत की, खय्याम खूपच अशुभ आहे. त्यांचं म्युझिक तर हिट होतं परंतु कधी सिल्वर जुबली करत नाही.”

खय्यामच्या नावानं प्रसिद्ध दिग्गज संगीतकार मोहम्मद जहूर खय्याम यांचं 92 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. छातीत इन्फेक्शन आणि निमोनियाच्या तक्रारीनंतर त्यांना मुंबईच्या सुजय रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.

https://www.instagram.com/p/B8qOSAFgzng/