किनवट, माहूरच्या कापूस शेतकऱ्यांना दिलासा, खरेदी केंद्र सुरू

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाउनमुळे सर्व व्यवहार बंदच होते त्यामुळे देशाचं आर्थिक चक्र थांबलं होतं. ते पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टिने सरकारने हळूहळू पावलं उचलायला सुरुवात केली आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात असलेल्या सीसीआय कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.

https://twitter.com/airnews_pune/status/1260407708454318081/photo/1

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम करण्यात आला. कापूस खरेदीची वाट पाहत असलेल्या किनवट आणि माहूर तालुक्यातील तीन हजार शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. या शेतकऱ्यांच्या २० हजार क्विंटल कापसाची खरेदी आता होणार आहे.