Kirit Somaiya | कथित व्हिडीओ प्रकरणी किरीट सोमय्यांची चौकशीची मागणी; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिले पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya | भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ (Offensive Video) व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या व्हिडीओवर अनेक राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तसेच सोमय्यांवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला जात आहे. दरम्यान, या व्हिडीओवरून स्वत: किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र पाठवल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले, “माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही. मी देवेंद्र फडणवीस यांना अशा आरोपांची व्हिडीओची सत्यता तपासावी आणि चौकशी करावी, अशी विनंती केली.”पत्रात सोमय्या म्हणाले की, “देवेंद्रजी, आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले. अशाप्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले.”

 

पुढे ते म्हणाले, “मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी (Inquiry) करावी,” अशी विनंती सोमय्यांनी फडणवीसांकडे केली.

“ही व्हिडीओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडीओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास)
या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी,
अशी मी आपणास विनंती करीत असल्याचे किरीट सोमय्या यांनी पत्रात नमूद केले आहे.

 

Web Title :  Kirit Somaiya | kirit somaiya first reaction to controversial video said i requested fadnavis about this

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा