वॉकिंग नव्हे करा ‘वॉकिंग मेडिटेशन’ ! अनेक गंभीर आजारांपासून रहाल दूर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आज आपण शरीर आणि मन यांच्यासाठी लाभदायक असणारा एक चालण्याचा प्रकार किंवा व्यायाम जाणून घेणार आहोत. या प्रकाराचं नाव आहे वॉकिंग मेडिटेशन. युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन मॅडिसनच्या मते आतड्यांमध्ये आलेली सूज, अस्थमा, अशा आजारांपासून दूर राहण्याचा या वॉकिंग मेडिटेशनचा खूप फायदा होतो.

वॉकिंग मेडिटेशन आहे तरी काय ?

यात तुम्हाला एका विशाल गोलाकार भागावर तुम्हाला सरळ रेषेत चालायचं असतं. यात मेंदू एका जागी केंद्रीत होत असतो. हळूहळू पुढे चालायचं असतं. यावेळी डोक्यात अनेक विचार येत असतात. परंतु काही वेळानंतर मन शांत होत असतं. वॉकिंग मेडिटेशनचे अनेक फायदे होतात.

काय आहेत फायदे ?

1) ब्लड सर्क्युलेशन – जे बैठं काम करतात त्यांनी पाय हलके करण्यासाठी वॉकिंग मेडिटेशन करावं. यामुळं शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि रक्ताभिसरण चांगलं होतं.

2) पचनक्रिया सुधारते – जेवणानंतर अन्न पचवण्यासाठी याचा खूप फायदा होतो. पचनक्रिया सुधारण्यासाठी याचा खूप फायदा होतो. जेवल्यानंतर जर पोट फुगल्यासारखं वाटत असेल किंवा शरीर जड वाटत असेल तर हा व्यायाम नक्की करावा. अन्नपचन चांगलं होण्यासही यामुळं फायदा होतो.

3) स्ट्रेस कमी होतो – 2017 साली झालेल्या एका शोधातून अशी माहिती समोर आली आहे की, वॉकिंग मेडिटेशनमुळं डोक्यात किंवा मनात येणारे विविध विचार कमी होण्यास फायदा होते. याशिवाय तुम्ही तणावात असाल तर मन शांत ठेवण्यासही याचा खूप फायदा होतो.