गरोदरपणात ‘कॅल्शियम’ची कमतरता ‘या’ 5 प्रकारे दूर करा, असा घ्या आहार

पोलीसनामा ऑनलाइन – कॅल्शियमची कमतरता गरोदर महिला आणि तिच्या पोटातील बाळासाठी त्रासदायक ठरू शकते. कारण गरोदर महिलेच्या शरीरातील कॅल्शियम कमी होण्याची जास्त शक्यता असते. यासाठी गरोदर महिलेने योग्य आहार घेतला पाहिजे. यामुळे बाळ आणि माता यांना योग्यप्रमाणात पोषक घटक मिळतात. बाळाचा विकास चांगला होतो. गरोदरपणात व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे एनिमीया समस्या उद्भवू शकते. यासाठी फोलेट, व्हिटामीन सी आणि आर्यनचे पोषक तत्व असलेले पदार्थ आहारातून घेतले पाहिजेत. गरोदर महिलेने कोणता आहार घ्यावा ते जाणून घेवूयात.

असा घ्यावा आहार

1 आहाराची वेळ
गरोदर स्त्रीने थोडे-थोडे आणि सतत काहीतरी खावे. आहाराच्या नियोजनामध्ये मध्य सकाळ आणि मध्य दुपारच्या आहाराचा समावेश करा. ताक, लस्सी, भाजलेले मखना, कडधान्ये हे पदार्थ दोन जेवणांच्या मध्ये खावेत.

2 संतुलित आहार
मोड आलेली कडधान्य खा. दुपारच्या आणि रात्रीच्या पोषक जेवणासाठी, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी, राजगिरा यांच्यापैकी पूर्ण धान्याची निवड करा. त्यासोबत भाज्या आणि डाळी, शेंगा, अंडी, मासे किंवा चिकन असे प्रथिनयुक्त पदार्थ खा.

3 लोह
आहारात फळे, मोड आलेल्या शेंगा, आंबवलेले पदार्थ खावेत. यातून शरीराला लोह मिळेल. जास्त मीठ खाऊ नये. अति खाणे टाळा. दररोज 8-12 ग्लास पाणी प्यावे.

4 आर्यन
गररोदरपणात महिलांनी आहारात बीट,राजमा. नारळाचं सेवन केल्यास शरीराला आर्यन मिळते. दुधीचा सुद्धा आहारात समावेश करावा.

5 फोलेट
हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा. शेंगदाणे, सुर्यफुलाच्या बीया यातून भरपूर फोलेट मिळते. यामुळे मुलाच्या मेंदूच्या वाढ चांगली होते.