पोस्टाच्या ‘या’ योजनेत बँकेच्या FD पेक्षा लवकर ‘दुप्पट’ होतील पैसे, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटाच्या काळामध्ये सामान्य नागरिकांना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. सध्याच्या अडचणीच्या काळात ज्या प्रमाणे आर्थिक अडचण आली तशी भविष्यात येऊ नये, यासाठी लहान स्तरावर बचत करणे आवश्यक आहे. अशावेळी पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. सध्या बँकांच्या एफडीचे व्याज दर कमी झाल्याने एफडीवर मिळणारे व्याज कमी मिळत आहे. त्यामुळे पोस्टाच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममधून बँकांच्या एफडीपेक्षा चांगला रिटर्न मिळत आहे. यामध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्याचबरोबर यामध्ये जमा केल्या जाणाऱ्या पैशावर सॉव्हरेन गँरंटी देखील आहे.
FD च्या तुलनेत व्याजदर जास्त
पोस्ट ऑफिसमधील टाइम डिपॉझिट खाते ही योजना लहान बचतीसाठी फायद्याची आहे. यामध्ये 1,2,3 आणि 5 वर्षांसाठी पैसे जमा करता येतात. यामध्ये बँकेच्या तुलनेमध्ये एफडीवरील व्याजदर 1.40 टक्क्यांनी जास्त आहे. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयमध्ये 5 वर्षाच्या एफडीवर 5.3 टक्के वार्षीक व्याजदर आहे. तर पोस्टाच्या टाइम डिपॉझिटया योजनेत वार्षिक व्याजदर 6.7 टक्के. या योजनेचा फायदा घेऊ शकता.
टाइम डिपॉझिट खात्यासाठी व्याजदर
1. या खात्यातील 1 वर्षाच्या एफडीवर 5.5 टक्के व्याज
2. 2 वर्षासाठी 5.5 टक्के व्याज
3. 3 वर्षासाठी 5.5 टक्के व्याज
4. 5 वर्षासाठी 6.7 टक्के व्याज
5 लाख जमा केल्यावर 5 वर्षात किती रक्कम मिळेल तर किती कालावधीत रक्कम दुप्पट होईल ?
जमा करण्यात येणारी रक्कम 5 लाख
व्याज दर 6.7 टक्के वार्षिक
मॅच्यूरिटी पीहियड – 5 वर्षे
मॅच्यूरिटीनंतर मिळणारी रक्कम – 6 लाख 91 हजार 500 रुपये
व्याजाचा फायदा – 1 लाख 91 हजार 500 रुपये
6.7 टक्के वर्षिक व्याजाच्या हिशोबाने पोस्ट ऑफिसमध्ये टाइम डिपॉझिट योजनेमध्ये जमा केलेली रक्कम दुप्पट होण्यासाठी साधारण 10.47 वर्षे म्हणजेच 129 महिने लागतील.
या योजनेची विशेषता
पोस्ट ऑफीसमधील ही योजना रोख रक्कम किंवा चेकच्या माध्यमातून काढता येते. इंडिया पोस्टच्या मते, चेकची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्याच्या तारखेपासून तुमचे खाते सुरु होते. या योजनेत कोणतेही सिंगल खाते उघडता येते. 3 प्रौढ व्यक्ती मिळून जॉइंट खाते देखील सुरु करू शकतात. तर 10 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलाच्या नावावर अभिभावक खाते उघडता येते. खाते सुरु करण्यासाठी कमीत कमी 1000 रुपये रक्कम असून जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवू शकता. 100 च्या पटीमध्ये जास्तीत जास्त रक्कम गुंतवणूक करता येते. या खात्यामध्ये नॉमिनेशन पर्याय देखील उपलब्ध आहे. एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये खाते ट्रान्सफर करता येते. मात्र, प्रीमॅच्यूअर विथड्रॉल करायचे असेल तर दंड भरावा लागेल. टाईम डिपॉझिटवर जमा रकमेवर इनकम टॅक्स कायदा 1961 च्या सेक्शन 80 सी अंतर्गत करामध्ये सूट मिळते.