सर्व स्टेशनवर लागणार ‘नो बिल नो पे’, रेल्वे प्रवाशांना होणार थेट फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधांचा विचार करून, स्टेशनच्या सर्व स्टॉलवर ‘नो बिल नो पे’ असा बोर्ड लावणे अनिवार्य केले आहे. रेल्वने एक सूचना जारी करत सांगितले की, भारतीय रेल्वेच्या सर्व स्टेशनवर असलेल्या स्टॉलवर ‘नो बिल नो पे’ असा बोर्ड लावणे अनिवार्य करण्यात यावे. त्या सोबतच पीओएस मशीन देखील लावावे लागणार आहे. या सुचनांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

पूर्व-मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश कुमार यांनी सोमवारी सांगितले की, भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधांचा विचार करून सर्व झोन आणि मंडळाना सूचना दिल्या आहेत की स्टेशनच्या सर्व स्टॉलवर ‘नो बिल नो पे’ असा बोर्ड लावणे अनिवार्य करण्यास सांगितले आहे. आणि पीओएस मशीन लावणे देखील महत्वाचे असल्याचे सांगितले आहे.

सुचनांचे पालन केले नाही तर नुकसान भरपाई द्यावी लागणार

सुचनांचे पालन केले नाही तर नुकसान भरपाई द्यावी लागणार असेही सांगण्यात आले आहे. ते म्हणाले की, आशा प्रकारे प्रवाशांसाठी हा निर्णय एक मैलाचा दगड ठरेल. पूर्व-मध्य रेल्वे देखील प्रवाशांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर आहे. पूर्व-मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री ललित चंद्र त्रिवेदि यांना दानापुर, सोनपुर, धनबाद रेल्वे मंडळांना निर्देश देण्यास सांगण्यात आले आहे.

सर्व डीआरएम नी दिलेल्या सुचनांचे पालन व्यवस्थित होत आहे किंवा नाही तसेच सर्व स्टॉलवर ‘नो बिल नो पे’, असा बोर्ड लावण्यात आला आहे की नाही, पीओएस मशीन लावण्यात आली आहे की नाही याची चौकशी करावी असे आदेश देण्यात आले आहेत. प्रवाशांनी खरेदी केल्यानंतर त्याची पावती त्यांना देण्याची व्यवस्था करण्यात यावी. जर दुकानदार या सुचनांचे पालन करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असेही आदेश देण्यात आले आहेत.