डॉक्टरांचा गंभीर हलगर्जीपणा : शस्त्रक्रियेनंतर सर्जिकल ब्लेड तरुणाच्या शरीरातच राहिल्याने मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूरमधील एपल सरस्वती हॉस्पीटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने तरुणाचा जीव घेतला आहे. शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉक्टरांनी सर्जिकल ब्लेड त्याच्या शरीरात राहिले आणि त्याचा जीव गेला.

वसीन अस्लम गजबर (वय ३०, रा. राजारामपुरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुले परिसरात तणावाचे वातावरण आहे.

लेखी तक्रार अर्ज दिल्यानंतर तसेच इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याच्या आश्वासनानंतरच त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

वसीन हा पांजरपोळ परिसरात स्वत: चा ऑटो इलेक्ट्रीशियनचा व्यवसाय करत होता. गेल्या दोन वर्षांपासून तो कर्करोगाने ग्रासला होता. त्याच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान सोमवारी त्याच्या छातीत दुखू लागल्याने धाप वाढली. त्यामुळे त्याला उपचारासाठी कदमवाडी येथील एपल सरस्वती हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्या फुफ्फुसातील हवा बाहेर काढण्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. तेव्हा डॉक्टरांकडून एक सर्जिकल ब्लेड शरीरातच राहिले. त्यानंतर डॉक्टरांमध्ये याबाबत चर्चाही झाली. त्यांची चर्चा त्याच्या चुलत्याने ऐकली.

Loading...
You might also like