Kolhapur Rain | कोल्हापूरात रस्ता 15 फूट खचल्याने 20 गावांचा संपर्क तुटला; गगनबावडा तालुक्यातील अणदूर-धुंदवडे रस्ता खचला (व्हिडीओ)

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur Rain | कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे (Kolhapur Rain) पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते पाणीखाली गेले आहेत. गगनबावडा हा सह्याद्री पर्वतरांगेवरील डोंगराळ तालुक्यातील अणदूर धुंदवडे रस्ता धुवांधार पावसामुळे (Kolhapur Rain) तब्बल १५ फूट खचला आहे. रस्ता खचल्याने हा परिसरातील किमान १५ ते २० गावांचा संपर्क तुटला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचा निम्मा भाग हा डोंगराळ आहे. या भागात गेल्या ८ दिवसांपासून तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे अणदूर धुंदवडे हा घाट रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे.

अनेक ठिकाणी रस्ताचा संपूर्ण भाग जवळपास १५ फूट खाली गेला आहे. दोन ते तीन ठिकाणी हा रस्ता खाली गेला आहे. त्यावरुन पायी चालणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे हा संपूर्ण रस्ता नव्याने बांधावा लागणार आहे.
काल ही घटना घडली असली तर पावसाचा जोर असल्याने व परिसरात नेटवर्क नसल्याने हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नव्हता. आज सकाळी पावसाचा जोर कमी झाल्यावर लोक घराबाहेर पडले.
तेव्हा हा प्रकार लक्षात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आता पावसाचा जोर ओसरला आहे.
काल दिवसभरात कोल्हापूर शहरात पाऊस थांबला होता.
पण अजूनही अनेक भागात पाणी शिरलेले असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Web Title : Kolhapur Rain | In Kolhapur, 20 villages were cut off due to 15 feet of road damaged

 

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची विजयी सुरुवात;
टोकिओ ऑलपिंकमध्ये पहिल्या सामन्यात सहज केली मात

Income Tax | प्राप्तीकर विभागाचा दावा, दैनिक भास्कर ग्रुपने केली 700 कोटी रुपयांच्या टॅक्सची ‘चोरी’

NIV Pune Recruitment-2021 | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर

Mukesh Ambani | चीन आणि अमेरिका इतका श्रीमंत होईल India,
जाणून घ्या मुकेश अंबानी यांनी का केले ‘हे’ वक्तव्य

Vaginal Infection | मान्सूनमध्ये तब्येत बिघडवून टाकेल व्हजायनल इन्फेक्शन,
जाणून घ्या लक्षणे आणि बचाव