घरफोडी करणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी केली अटक ; ५ गुन्हे उघडकीस

 पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये अनिल भगवान मनशारामानी (वय 40 राहणार कंचन सनरत्न हौसिंग सोसायटी निंबाळकर वस्ती येवलेवाडी पुणे) यांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याची चौकशी करत असताना. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता. एक अनोळखी इसम कंचन सनरत्न सोसायटी मध्ये संशयित रित्या फिरत असल्याचे दिसल्या वरून पोलीस नाईक अमित साळुंखे व पोलीस शिपाई जगदीश पाटील यांनी सोसायटीमधील कॅमेरा व सोसायटीकडे येणाऱ्या मार्गावरील कॅमेऱ्याची बारकाईने पाहणी केली असता.

सोसायटीमध्ये फिरत असलेला संशयित हा एका रिक्षांमधून येत असल्याचे त्यांना दिसले त्यांनी त्या रिक्षाचा सीसीटीव्ही कॅमेराद्वारे रिक्षा क्रमांक एम एच 12 CT 7121 मधून संशयित चोर आल्याची खातरजमा झाल्यावर रिक्षाचा मालक अब्बास सिकंदर सय्यद(राहणार. लोहियानगर,521,गंज पेठ,पुणे) याच्याकडे चौकशी केली असता. त्यांनी सदर रीक्षा सिकंदर इब्राहिम शेख(राहणार.दलाल चौक,घोरपडी पेठ,पुणे) याला करारावर चालवण्यासाठी दिली आहे. असे सांगितले, त्या अनुषंगाने सिकंदर शेख याचा शोध घेऊन सदर रिक्षा बाबत चौकशी केली असता. त्याने ही रिक्षा आमिर रफिक शेख(राहणार.ग्रीन पार्क गल्ली,कोंढवा खुर्द,पुणे) यास सिफ्टने रिक्षा चालवण्यासाठी दिल्याचे सांगितले. अमीर शेख यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता. त्याने त्याच्या साथीदार मुस्तफा शकील अन्सारी(राहणार. नवाजीश पार्क,कोंढवा खुर्द,पुणे) यांच्यासह रिक्षातून सदर ठिकाणी जाऊन चोरी केल्याचे कबूल केले.

मुस्तफा शकील अन्सारी हा पुणे शहर पोलिसांच्या रेकॉर्डवर घरफोडी,चोरी करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशन मध्ये एकूण 16 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला नवाजीश पार्क येथे सापळा रचून ताब्यात घेऊन त्याच्याकडे घरफोड,चोरी प्रकरणी सखोल चौकशी केली असता. त्याने कोंढवा व वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत एकूण 5 घरफोडी चोरी केलेले गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये नमूद केलेल्या गुन्ह्यांमध्ये 6 लाख 50 हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा 45 हजार किंमत रुपये असा एकूण 6 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमालसह गुन्हा करण्यासाठी वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आली.

सदरची कामगिरी, माजी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर सुनील फुलारी, पोलीस उप आयुक्त परिमंडळ – 05 पुणे शहर प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर मिलिंद पाटील, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, पोलीस हवालदार राजशेखर साळुंखे, विलास तोगे,  जगदीश पाटील, योगेश कुंभार, संजीव कळंबे, सुरेंद्र कोळगे, किरण मोरे, सुशील दिवार, निलेश वनवे, उमाकांत स्वामी, अजीम शेख, इक्बाल, विलास ढोले यांच्या पथकाने केली.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास, कोंढवा पोलीस स्टेशनचे उप पोलीस निरीक्षक संतोष शिंदे करीत आहेत.

प्रामुख्याने, पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी पुणे शहरात ‘थर्ड आय’ प्रोजेक्ट हा संपूर्ण पुणे शहरात सीसीटीव्ही कॅमेरा एकत्रित संकलित करण्याचा प्रोजेक्ट(उपक्रम) राबविल्यामुळे पुणे शहरातील मुख्य रस्ते,सोसायटी मार्ग,अंतर्गत रस्ते या ठिकाणावर कोणकोणत्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत याबाबतची माहिती तयार करण्यात आली आहे.या माहितीच्या आधारे व सीसीटीव्ही कॅमेराद्वारे मिळालेला फुटेजमुळे आरोपींना जेरबंद करण्यास मदत होत आहे तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासही मदत होत आहे. या अभिनव उपक्रमाचे पुणे शहरातील सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे.