‘रामायण’वरील ‘त्या’ प्रश्नावरून ‘कृष्ण’ नितीश भारद्वाज यांनी केला सोनाक्षीचा ‘बचाव’, ट्रोल केल्याबद्दल मुकेश खन्नांना दिला ‘हा’ सल्ला

पोलीसनामा ऑनलाईन :महाभारत या दूरदर्शनवरील मालिकेत भीष्म पीतामह साकारणारे आणि शक्तीमान मालिकेतील प्रमुख अभिनेते मुकेश खन्ना यांनी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला ट्रोल केलं होतं. यावर टीव्हीचे कृष्ण म्हणजेच नितीश भागद्वाज यांनी सोनाक्षी सिन्हाची बाजू घेत मुकेश खन्ना यांना सल्ला दिला आहे.

महाभारताच्या रिपीट टेलिकास्टच्या निमित्तानं बोलताना एका मुलाखतीत मुकेश म्हणाले की, “रामायण आणि महाभारत यांसारख्या मालिका पुन्हा प्रसारीत केल्यानं सोनाक्षी सिन्हा सारख्या लोकांना मदत होईल ज्यांना मायथॉलॉजीबद्दल काही माहिती नाही.” सोनाक्षी बिग बी अमिताभ यांच्या केबीसीमध्ये गेली होती. यावेळी तिला विचारण्यात आलं की, हनुमाजी कोणसाठी सजीवनी बुटी घेऊन आले होते. यावर तिला उत्तर द्यायला जमलं नव्हतं. यावरून मुकेश खन्नांनी तिच्यावर निशाणा साधला होता.

महाभारत मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या नितीश यांनी सोनाक्षीचा बचाव केला. एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, “मी माझे मित्र मुकेश खन्ना यांना सांगू इच्छितो की, “एका पूर्ण पिढीला आणि भारतीय वारसा आणि साहित्यबद्दल काहीच माहिती नाही असंही असू शकतं. यात त्यांची चूक नाही. यात कोणाचा दोष असेल तर तो पहिल्या पिढीचा आहे ज्यांनी आपल्या मुलांना भारतीय वारसा आणि साहित्याची ओळख करून दिली नाही. यात आपल्या आपल्या शिक्षण व्यवस्थेचाही दोष आहे जी ब्रिटीश राजवटीच्या काळातील आहे.

नितीश पुढे म्हणाले, “हे सगळं शालेय शिक्षणात समाविष्ट करायला हवं. कारण शिक्षणाचं आधीच एवढं ओझं असताना याचं ओझ त्यांच्यावर नाही टाकू शकत. 1947 नंतर जास्त कोणत्या सरकारनं शिक्षणात जास्त बदल केले नाहीत. ज्यांनी केले त्यांना धार्मिक उन्माद असं नाव दिलं.”