धुळे : पारोळा रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत मजुर ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – सुरत-नागपूर महामार्गावर पंकज हॉटेल समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत पारोळा रोडवर दुचाकीस्वार मजुराचा मृत्यू झाला. बहादूर दिप्पल गौतम (वय 35) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार मजुराचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती की, बहादूर दिप्पल गौतम हे चोपडा येथे त्यांचे भावाच्या घरी कामानिमित्त भेटायला गेले होते. भेट झाल्यानंतर चोपडाहुन सायंकाळी परत दुचाकीवरून धुळ्याकडे परत येत असताना सुरत नागपूर महामार्गावर पारोळा रोडवरील हॉटेल पंकज समोरील रस्त्यावर त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने जोरदारपणे धडक दिली. यात बहादूर डिंपल गौतम हे दुचाकीवरून रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. ते रक्तबंबाळ झाले. रस्त्याच्या आजूबाजूला नागरिकांनी अपघात झाल्याचे पहाताच मदतीसाठी पुढे सरसावले व तातडीने त्यांनी जखमी व्यक्तीला उपचारार्थ चक्करबर्डी येथील भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

या नंतर मृतदेह नातेवाईक व नागरिकांच्या मदतीने पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला. मृत व्यक्तीची ओळख पटली आहे. त्यांचे नाव बहादूर डिंपल गौतम आहे. बहादूर हे मजुरी करतात. ते मुळचे राहणारे उत्तर प्रदेशातील आहे. त्यातच त्यांचा अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताबाबत तालुका पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.