सर्वांसमोर पत्त्यासारखी ‘कोसळली’ हजारो लिटरची पाण्याची टाकी (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यात भलीमोठी पाण्याची टाकी कोसळल्याची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्ही हा व्हिडिओ नीट पाहिला तर पत्त्यांचा बंगला जसा एका सेकंदात कोसळतो तसंच काहीस ही टाकी फुटल्याचं पाहायला मिळालं. डोळ्याची पापणी लावताच भलीमोठी पाण्याची टाकी कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. २१ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की भीषण पद्धतीनं ही पाण्याची भलीमोठी टाकी कोसळली आहे. पाण्याची टाकी फुटल्यानं सभोवतालचा परिसर जलमय झाला होता. तर अनेक गावांसाठी पाणीप्रश्न निर्माण होणार आहे. दुर्घटनेमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास हा प्रकार घ़डल्य़ाचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अधिकाऱ्यांविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. टाकी कोसळल्यानं पाण्याचं अतोनात नुकसान झालं आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आली नाही. ही पाण्याची टाकी दोन वर्षांपूर्वी बांधली असल्याचं तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. जर ही टाकी बांधून दोनच वर्ष झाली तर एवढ्या लवकर कोसळली कशी? याचा अर्थ निकृष्ट दर्जाचं बांधकाम होतं का? यासारखे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. ही दुर्घटना तिथल्या स्थानिक नागरिकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान या पाण्याच्या टाकीची तपासणी आणि टागटुजी करण्यात आली नव्हती का असा सवालही उपस्थित केला जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like