धक्कादायक ! पतीचा ‘कोरोना’मुळं झाला मृत्यू, विधवा आणि 3 मुलींनी केलं विष प्राशन, हॉस्पीटलमध्ये दाखल

नैनिताल : वृत्तसंस्था – कोरोना ज्या प्रकारे कुटुंबांचे नुकसान करत आहे, त्याचे ताजे उदाहरण हल्द्वानी प्रदेशातील ही घटना आहे. जनपदच्या हल्द्वानीमध्ये मल्ला ब्यूरा भागात एका महिलेने नैराश्यात येऊन आपल्या वय १५, ११ आणि ५ वर्षांच्या तीन मुलींसह विष पिले. त्यानंतर त्यांची प्रकृती पाहता त्यांना बेस रुग्णालयात नेण्यात आले. प्रथमोपचार मिळाल्यानंतर त्यांना उच्च केंद्रात पाठवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला आपल्या पती आणि तीन मुलींसह हल्द्वानी येथे राहत होती. सोमवारी कोरोनामुळे या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला, त्यानंतर ती महिला नैराश्यात होती. मंगळवारी सकाळी महिलेने आपल्या तीन मुलींसोबत विषारी पदार्थ खाल्ला. यानंतर स्थानिक लोकांच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आई आणि मुलींना रुग्णालयात पाठवले आणि उपचार सुरू झाले.

क्षेत्र अधिकारी हल्द्वानी शांतनु यांनी सांगितले की, मृत ललितला हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर रुग्णालयात तपासणी केल्यावर ललितला कोरोना असल्याचे आढळले. सोमवारी ललितचा मृत्यू झाला, कुटुंबही क्वारंटाइन होते. त्यानंतर कुटुंबातील महिला आणि तीन मुलींनी हे पाऊल उचलले. सध्या त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे, परंतु ४८ तास डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहतील.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like