आई-वडीलांची सेवा केल्याने तिर्थयात्रेचे पुण्य मिळते : महामंडलेश्वर श्री श्री 1008 शिवगिरी महाराज

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – आई वडीलांची सेवा केल्याने तिर्थयात्रा करण्याचे पुण्य मिळते हे सर्वप्रथम श्री गणेश महाराज यांनी कृतीतुन प्रदिक्षणा करून दाखवुन दिले आहे. असे महामंडलेश्वर श्री श्री 1008 प.पु. शिवगिरी महाराज म्हणाले. लासलगाव येथे गणेश मंदीर ट्रस्टच्यावतीने गणेश जयंतीदिनी मंदिराच्या दहाव्या वर्धापनदिना निमीत्ताने संपन्न झालेल्या कार्यक्रमात गणेशभक्तांना प्रवचनात ते बोलत होते.

सर्वात मोठे तिर्थ हे आई वडीलांचे मनोभावे पुजन असुन आई वडीलांची सेवा केली तर सर्व तिर्थयात्रेचे पुण्य मिळते. आई वडीलांची सेवा ही कोणत्याही धार्मीक कार्यापेक्षा मोठी असुन बाहेर वेगवेगळ्या तिर्थयात्रा करायचा आणि आई वडीलांची सेवा करीयची नाही असे जे लोक करतात ते कदापी समाधानी होऊ शकत नाही. असे सांगून आई वडीलांना प्रदिक्षणा घालुन सर्व तिर्थयात्रेचे पुण्य मिळते हे सर्व प्रथम गणपती देवाने वस्तुपाठ घालुन दिला आहे. गणपतीची आराधना विविध मार्गाने केली जाते. असे सांगून शिवगिरी महाराज यांनी गणेश पुजन हे विधीवत असले पाहीजे आज गणेश जयंतीनिमित्त महाप्रसाद होत आहे. त्याबद्दल गणेश मंदिराचे पदाधिकारी मोठे पुण्यशील आहेत असे ते म्हणाले.

शिवगिरी महाराज यांचा सत्कार जि.प.सदस्य व ट्रस्टअध्यक्ष डी.के.जगताप यांनी केला तर उपस्थितीतांचे स्वागत सचिव व लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी केले. व दहा वर्षात या मंदिराने विविध सामाजिक उपक्रम राबवुन जनहिताची कामे केली आहेत असे सांगितले. यानंतर श्री गणेश मंदिरातील गणेश मुर्ती समोर शेकडो मान्यवरांनी सपत्नीक महाआरती केली.

श्री गणेश मंदीर दहाव्या वर्धापन दिनानिमीत्त भंडारा महाप्रसादात सहा हजार भाविकांनी महाप्रसाद घेतला.  त्यानंतर श्रीगणेश अथर्वशिर्ष कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर महिला पुरूष सहभागी झाले होते. त्यानंतर महाआरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

या गणेश मंदिर ट्रस्ट अध्यक्ष डी.के.जगताप, सचिव सुवर्णा जगताप, उपाध्यक्ष बापुसाहेब (निलेश) लचके, खजिनदार उत्तम घंगाळे, विश्वस्त मुरलीधर वर्मा, अॅड. शेखर देसाई, निलेश वर्मा, हिरालाल अलिझाड, नवनाथ श्रीवास्तव, विलास लोहारकर, निलेश वर्मा, निलेश पटणी, रमेश राठी, दत्तात्रय माळी, कैलास जैन, मनोहर खिलवाणी, अभिजित लचके, योगेश पाटील, लक्ष्मण सांगळे, नामदेव उगले, नारायण भालेराव, नामदेव कदम, पुजारी विवेक जोशी, भगवान फसाले, कपील लचके, दाभाडे सर, अमित बकरे, छत्र होळकर, राजेश कराड, महेश वर्मा, दिपक सोळसे, शरद लोहकरे यांच्यासह अनेकजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी आमदार कल्याणराव पाटील, संजय पाटील, प्रकाश दायमा, पंचायत समिती सदस्य रंजना पाटील, निता पाटील, संतोष पलोड, पुरूषोत्तम चोथाणी, नंदकुमार डागा, कैलास सोनवणे, राजेंद्र डोखळे, राजेंद्र बोरगुडे दिलीप कापसे, शंतनु पाटील, राजु राणा, योगेश पाटील, अनिल सोनवणे बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, दुय्यम निबंधक देशपांडे यांच्यासह मान्यवरांनी गणेश मुर्तीचे दर्शन घेतले.