लासलगांव : कांदा दरात 300 रुपयांची घसरण

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – कांद्याचे आगार असलेल्या लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दरात घसरण सुरु आहे. दिनांक २२ जानेवारी च्या तुलनेत कांदा दरात ३०० रूपयांची घसरण झाली. आज येथील बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सरासरी तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. देशातील सगळ्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यामुळे बाजारभावात सातत्याने कांदा दरामध्ये घसरण सुरू आहे. यामुळे केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवुन आणि कांदा साठवणुकीची मर्यादा रद्द करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.

यासाठी लासलगांव कृषी उत्पन्न बाजार सभापदी सुवर्णा जगताप यांनी कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालक मंत्री छगन भुजबळ आणि खा भारती पवार यांना पत्रव्यवहार करुण निर्यात बंदी आणि कांदा साठवनुकवर असलेली मर्यादा उठवाने बाबत पत्रव्यवहार केला आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर यांनी विंचूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांच्याकडे निर्यातबंदी आणि साठवणुक मर्यादा उठवावी यासाठी साकडे घातले आहे. मात्र अद्यापपर्यंत सरकारकडून याबाबत कुठलाही निर्णय न झाल्याने कांदा दरामध्ये दररोज घसरण दिसत आहे.

माहे सप्टेंबर, २०१९ पासुन संपुर्ण देशभरात कांदा आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारातील कांदा दरवाढीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने दि. २९ सप्टेंबर, २०१९ चे अधिसूचनेनुसार भारतातून होणा-या सर्व प्रकारच्या कांद्याचे निर्यातीस प्रतिबंध केला असुन ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दि. ०३ डिसेंबर, २०१९ चे आदेशानुसार देशभरातील घाऊक व्यापा-यांना २५० क्विंटलपर्यत (२५ मे. टन) व किरकोळ व्यापा-यांना ५० क्विंटलपर्यंत (०५ मे. टन) कांदा साठवणुकीची मर्यादा लागु केल्याने येथील व्यापारी वर्गास मोकळ्या स्वरूपातील कांदा खरेदीमुळे त्यांच्या दैनंदीन कांदा खरेदीवर बंधन आलेले आहे.

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सद्यस्थितीत विक्रीस येणा-या अली खरीप कांद्याची टिकवण क्षमता ही कमी असल्याने येथील शेतक-यांना सदरचा कांदा शेतातुन काढलेनंतर लगेच विक्री केल्याशिवाय कोणताही पर्याय नाही. त्यामुळे येथील बाजार समित्यांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर सदरचा कांदा विक्रीस येत आहे.मात्र कांदा दरात घसरण होत असल्याने शेतकरी वर्ग आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे.

आज येथील कृषी उत्पन्न बाजार समितित लाल कांद्याला कमीत कमी १५००, सरासरी ३३२५ तर ३८१५ रुपये भाव मिळाले.

देशातील प्रमुख बाजार समितितील बाजार भाव 

लासलगांव – ३३००
पिंपळगाव बसवंत-३२५१
पुणे -२७००
अलीगड उत्तर प्रदेश -३८५०
देसा,गुजरात – ३५००
सूरत -३३७५
हरियाणा -३७५०
जोधपुर -३०००
उदयपुर -३१००

फेसबुक पेज लाईक करा –