लासलगाव : श्रीगोदा रंगनाथ कल्याणोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – येथील श्री भक्तवत्सल बालाजी मंदिरात दरवर्षाप्रमाणे याहीवर्षी श्रीगोदा रंगनाथ कल्याणोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या उत्सवात श्री रंगनाथ भगवान आणि भगवती श्री गोदाम्बा देवीचा लग्न सोहळा मोठ्या थाटात हजारो महिला-पुरुष भक्तांच्या उपस्थितीत पार पडला

लासलगाव येथे कोटमगाव रोडवर असलेले श्री भक्तवत्सल मंदिरात शनिवारी दुपारी श्री गोदा-रंगनाथ कल्याणोत्सवाच्या धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. तर रविवारी संध्याकाळी भगवती श्री गोदाम्बा देवी आणि श्री रंगनाथ भगवान यांचा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या लग्न सोहळ्यासाठी भगवती श्री गोदाम्बा देवीकडून यजमान भेरू महाराज जांगिड (छोटा) तर श्री रंगनाथ भगवान यांच्याकडून प्रशांत भुतडा यांच्या कुटुंबांनी लग्न सोहळ्यातील संपूर्ण विधी पार पाडला. या लग्न सोहळ्यात मंगलाष्टक संपन्न झाल्यानंतर फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली. यावेळी भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

या श्री गोदा रंगनाथ कल्याण उत्सवासाठी गोविंद सेवक ग्रुप, गायत्री परिवार, बाबा अमरनाथ ग्रुप, प पू संत श्री भगरीबाबा ग्रुपच्या सेवकांनी परिश्रम घेतले. भगवान श्री माताजींच्या लग्नसोहळ्यासाठी लासलगाव परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/