‘…म्हणून मी लग्न केलं नाही’, दिग्गज ‘गायिका’ लता मंगेशकरांचा ‘खुलासा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  दिग्गज गायिका लता मंगेशकर यांचं वय आज 90 वर्षे आहे. असं असलं तरी आजही त्यांनी लग्न केलंलं नाही. एका मुलाखतीत बोलताना लता दीदींनी लग्न न करण्याच्या निर्णयाचा खुलासा केला आहे.

लता दीदी म्हणाल्या, “मी 13 वर्षांची असताना माझे वडिल वारले. यानंतर घरातील प्रत्येक जबाबदारी माझ्यावर होती. अशात खूपदा लग्नाचा विचार मनात येऊनही मी लग्न करू शकले नाही. खूपच कमी वयात मी कामाला सुरूवात केली. कामही भरपूर होतं. विचार केला आधी भावंडांना मार्गी लावू मग लग्नाचा विचार करू. नंतर बहिणीचं लग्न झालं. त्यांना मुलं झाली. त्यांना सांभाळंल. असं करत करत लग्नाची वेळही निघून गेली.”

लता दीदी पुढे म्हणाल्या, “भावंडांसाठी मी आई आणि वडिल अशा दोन्ही भूमिका पार पाडल्या. मी त्यांना कधीच रागावले नाही. आम्ही सांगलीत मोठ्या घरात राहायचो. आम्ही कधीच भांडण केलं नाही. आमच्या वडिलांनी ते घर बांधलं होतं.

1558 सालापासून लता दीदींनी फिल्मफेअर पुरस्कारापासून अनेक पुरस्कार मिळवण्यास त्यांनी सुरुवात केली. 2001 साली त्यांना भारत रत्न आणि महाराष्ट्र भूषण असे अनेक पुरस्कार मिळवले आहेत.