महागाईचा ‘भडका’ ! घरगुती गॅसनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात ‘वाढ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली. तसेच रेल्वेच्या तिकीट दरातही वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना चांगला धक्का बसला. तर नवीन वर्षाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे गुरूवारी पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाल्याने नागरिकांच्या खिशाला झळ बसली आहे. मुंबईत पेट्रोल पेट्रोल 80.87 रूपये झाले आहे. दिल्लीत पेट्रोल 11 तर कोलकातामध्ये 8 पैसे प्रतिलिटर महागले आहे. डिझेलचे दर दिल्लीत 11, कोलकाता 14 पैसे तर मुंबई आणि चेन्नईमध्ये 12 पैसे लिटरमागे दरवाढ झाली आहे. या महागाईमुळे नवीन वर्षातही नागरिकांना कसरत करावी लागणार असल्याचे दिसत आहे.

मुंबईत पेट्रोलचे सर्वाधिक म्हणजेच सुमारे 80 रुपये प्रतिलिटर दर आहे. तर दिल्लीमध्ये सर्वात कमी 76 रुपये पेट्रोलचा दर आहे. चेन्नईमध्ये डिझेलचे दर सर्वाधिक 71.98 तर सर्वात कमी दर दिल्लीत आहे.

इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावरील आजचे दर

1) दिल्ली – पेट्रोल- 75.25 रुपये डिझेल- 68.10 रुपये.

2) मुंबई – पेट्रोल- 80.87 रुपये डिझेल- 71.43 रुपये.

3) कोलकाता – पेट्रोल- 77.87 रुपये डिझेल- 70.49 रुपये.

4) चेन्नई- पेट्रोल- 78.20 रुपये डिझेल- 71.98 रुपये.

दररोज असे ठरतात इंधनाचे दर
प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती
तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा
1)
इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2) बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3) एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता.

रेल्वेनेही केली भाडेवाढ
तसेच नवीन वर्षात भारतीय रेल्वेने प्रवास भाडेवाढ करून लोकांना मोठा धक्काही दिला आहे. नवीन भाडेवाढ 1 जानेवारीपासून लागू होणार आहे. या भाडेवाढीचा मोठा फटका दूरचा प्रवास करणार्‍या प्रवाशांना बसणार आहे. रेल्वेने 4 पैसे प्रति किलोमीटर भाडेवाढ केली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीतही 19 रूपयांनी वाढ झाली आहे.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/