खुशखबर ! पेट्रोल – डिझेलच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील तीन दिवसांपासून पेट्रोलच्या दरामध्ये सतत घट होत आहे. इंडियन ऑईलकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यामध्ये डिझेलचे भाव 10-11 पैसे प्रति लीटरने कमी झाले आहेत.

यानंतर आता राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 73.27 रुपये लिटर झाले आहेत. त्याचबरोबर दिल्लीत डिझेलचे भाव देखील कमी झाले आहेत. दिल्लीत आज डिझेलचा दर 66.31 रुपये प्रतिलिटर झालं आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 75.92 रुपये लिटर झाले आहेत. मुंबईत आज डिझेलचा दर 68.67 रुपये प्रतिलिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 76.09 रुपये लिटर झाले आहेत.

सकाळी सहा वाजता बदलते किंमत –
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आता दररोज बदल होत असून नवीन दर रोज सकाळी सहा वाजल्यापासून लागू होतात. यामध्ये सर्व प्रकारच्या करांचा समावेश करून भाववाढ केली जाते.

एसएमएस द्वारे तुमच्या भागातील दर मिळवा –
तुमच्या भागातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्ही एसएमएसच्या मदतीने मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक मॅसेज येतो. प्रत्येक मोबाईल कंपनी आपल्या ग्राहकांना हि सुविधा पुरवत असते. विविध कंपन्यांचा कोड क्रमांक टाकून तुम्ही मॅसेज केल्यास तुम्हाला याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या