प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘लक्ष्या’ शेवटच्या दिवसात कसा आणि कुठं रहात होता ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  मराठीतील प्रसिद्ध अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेचा जन्म 3 नोव्हेंबर 1954 साली मुंबईत झाला. 16 डिसेंबर रोजी त्याचा स्मृती दिन असतो. आपल्या अभिनयानं मन जिंकणारा आणि विनोदानं खळखळून हसवणारा अभिनेता आपल्या सरत्या काळात सर्वांशी तुटक वावरू लागला होता.

लेले विरूद्ध लेले हे नाटक करताना लक्ष्या दौरे करत होता. याच दरम्यान त्याच्या दोन्ही किडण्या फेल झाल्या. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या काळात तो सिनेमातही दिसला नाही. तो जास्त कोणाला भेटतही नव्हता. पुण्याच्या लोणावळ्यातील बंगल्यावर तो आपलं आजारपण काढत होता. तो खूप अशक्त दिसत होता. लोकांना कायम हसत खेळत दिसलो आणि शेवटच्या दिवसातही तशीच इमेज रहावी म्हणून लक्ष्यानं आजारपणाची आणि अशक्त झाल्याची बातमी साऱ्यांपासून लपवून ठेवली. 16 डिसेंबर रोजी लक्ष्या गेल्याची बातमी समोर आली. पूर्ण इंडस्ट्री दु:खात होती. लक्ष्या जाऊन 14 वर्षे झाली आहेत तरीही त्याच्या अभिनयाची छाप चाहत्यांवर अजूनही आहे.

लक्ष्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर टूरटूर हे त्याचं पहिलं नाटक आहे जे तुफान गाजलं होतं. हसली तर हसली हा त्याचा पहिला मराठी सिनेमा आहे. थरथराट, धुमधडाका, खतरनाक, झपाटलेला, अशी ही बनवाबनवी असे अनेक सिनेमे करून त्यानं प्रेक्षकांच्या काळजात घर केलंय. लक्ष्यानं अनेक बॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे. सलमान खानसोबत हम आपके है कौन सिनेमातही तो झळकला होता.