उद्धव ठाकरेंनीच नेतृत्व करावे, तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे मत

नवी दिल्ली : वृत्त संस्था – काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची आज एकत्रितपणे बैठक होईल. त्यात सर्व निश्चित करण्यात येईल. नव्या सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनीच करावे असे तीन पक्षातील नेत्यांचे मत असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया येत्या दोन दिवसात पूर्ण केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री कोण होणार, यावर त्यांनी सांगितले की, शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असून तो ५ वर्ष राहिल. मुख्यमंत्रीपदावर शिवसैनिकच राहणार असून याबाबत तीनही पक्षांची सहमत आहे. भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर आली आहे का असे विचारता राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याबाबत तीन पक्षांची सहमती झाली आहे.

त्यामुळे अशा ऑफर देण्याची वेळ निघून गेली आहे. केंद्राचे पद दिले तरी महाराष्ट्रात आता शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल. महाराष्ट्राच्या मनात आणि जनतेचा इच्छा आहे, त्याला उद्धव ठाकरे मान देतील, यावर माझ्या मनात शंका नाही, असे त्यांनी सांगितले.

Visit : Policenama.com