न्यूझीलंड मशीद हल्ला प्रकरण : क्राइस्टचर्च मध्ये 51 लोकांच्या मारेकर्‍याला विना पॅरोल जन्मठेपेची शिक्षा

क्राइस्टचर्च : वृत्तसंस्था –  न्यूझीलँडच्या क्राइस्टचर्च शहरात 2019 मध्ये दोन मशिदींमध्ये 51 लोकांची हत्या करणार्‍या बंदूकधारीला न्यायालयाने विना पॅरोलची जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

वृत्तसंस्था सिन्हुआच्या रिपोर्टनुसार, हा निर्णय न्यूझीलँडमध्ये अशाप्रकारचा पहिला निर्णय आहे, जो क्राइस्टचर्चच्या उच्च न्यायालयात प्रकरणाची अंतिम सुनावणी झाल्यानंतर तीन दिवसांनंतर आला आहे.

15 मार्च, 2019 ला 29 वर्षीय ऑस्ट्रेलियन ब्रेंटन हॅरिसन टेरेंट या व्यक्तीने 51 लोकांची हत्या केली होती आणि 40 अन्य लोकांना जखमी केले होते. ज्यामुळे त्याच्यावर 51 लोकांच्या हत्येचा, 40 लोकांच्या हत्येचा प्रयत्न आणि दहशतवादाच्या आरोपाखाली शिक्षा सुनावण्यात आली.

बीबीसीने न्यायाधीश कॅमरन मंडेर यांच्या संदर्भाने म्हटले की, आरोपीचा गुन्हा इतका अक्षम्य आहे की, त्याला मरेपर्यंत कारागृहात ठेवले, तरी सुद्धा ही शिक्षा खुप कमी होईल.

आरोपी टेरेंटचा बोलण्यास नकार

याशिवाय, या हल्ल्याने न्यूझीलँडला आपल्या बंदूक कायद्यात दुरूस्ती करण्यास भाग पाडले. गोळीबाराच्या घटनेनंतर एक महिन्यापेक्षा कमी काळात देशाच्या संसदेने लष्करासारखी अर्ध-स्वयंचलित शस्त्रे आणि त्यांच्या पार्टच्या निर्मितीवर प्रतिबंध लावण्यासाठी आवश्यक दुरूस्त्यांवर मतदान घेतले होते.