कर्ज ट्रान्सफर करण्याच्या वादातून अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण, पोलिसांनी केली ४ तासात सुटका

पोलीस आयुक्तांकडून पथकाला विशेष बक्षिश जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विक्री केलेल्या वाहनाचे कर्ज ट्रान्सफर करण्याच्या वादातून गाडीमालकाच्या अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. एनआरआय पोलिसांच्या पथकांनी अवघ्या चारच तासात अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवाळून बालकाची सुटका केली आहे. या विशेष कामगिरीमुळे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पथकाला बक्षिस जाहीर केले आहे. जिन्नत बचरसिंग राव (२८), सरोज जिन्नत राव (२५), आणि त्याचा भाऊ अर्जून बचरसिंग राव (२५) यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

हसिना अब्दुल हमीद शेख यांनी सरोज जिन्नत शेख या महिलेला आपल्या मुलाला आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने २३ मार्च रोजी सायंकाळी घेऊन गेली होती, त्यानंतर ती परत घेऊन आलीच नाही. अशी तक्रार एनआरआय पोलीस ठाण्यात केली होती. जिन्नत राव हा देखील इमारतीच्या खाली उभा होता. त्याने मुलाला गाडीतून कुठेतरी नेले त्याचा फोनही बंद होता, असे फिर्यादीत म्हटले होते. त्यानंतर पोलिसांनी वरिष्ठांना माहिती देऊन त्वरीत तपासाला सुरुवात केली.

जिन्नत हा मुळचा राजस्थानातील जालोर जिल्ह्यातील आहे. त्याच्याकडे कार असल्याने तो राजस्थानात जाऊ शकतो. ही बाब लक्षात आल्यावर पोलिसांनी तीन पथके त्यांच्या शोधार्थ रवाना केली. नवी मुंबई ते राजस्थानपर्यंतच्या महामार्गावरील टोल नाक्यांवर या वाहनाचा शोध घेण्याची जबाबदारी एक पथक निभवत होतं. तर एक पथक गुजरात राज्यातील विविध जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखांच्या संपर्कात होते. तर एक पथक त्यांच्याशी गुजरात आणि राजस्थानातील नियंत्रण कक्षांशी संपर्कात होते. पोलीस हवालदार गोकुळ ठाकरे यांनी ही भूमिका बजावली. टोलनाक्यांवर माहिती घेतल्यानंतर ही गाडी वापी, वलसाड, सुरत, भरुचमार्गे गेली असल्याची माहिती गुन्हे शाखा आणि एसओजीचे पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. अखेर रात्री १० च्या सुमारास भरुच टोल नाका येथे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक योगेश गढीया व एसओजीचे पोलीस अधिकारी यांनी मुलासह गाडी ताब्यात घेतली. त्यानतंर तिघांना एनआरआय पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या उल्लेखनीय कामागिरीमुळे पोलीस आयुक्तांनी पथकाला विशेष बक्षिस जाहीर केले आहे.

ही कामगिरी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार, सहा पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांच्या मार्गदर्शाखाली परिमंडल १ चे पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे, तुर्भे विभागाचे सह पोलीस आयुक्त अमोल झेंडे, पोलीस उपनिरीक्षक भुषण कापडणीस, योगेश परदेशी व इतरांच्या पथकाने केली.