लॉकडाऊन : पुण्यात कारच्या धडकेत 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कठड्यावर बसललेल्या व्यक्तीला भरधाव कारने धडक देऊन झालेल्या अपघातात त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. घोरपडी येथे रविवारी सकाळी ही घटना घडली.

गोपी अरीफ स्वामी (वय 52, रा. गणपती चौक, अगलावी चाळ, घोरपडी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी बेनी अरीफ स्वामी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भाऊ अगलावी चाळ येथील घराजवळ असलेल्या कठड्यावर बसले होते. त्यावेळी भरधाव आलेल्या अज्ञात कार चालकाने त्यांना धडक दिली. यामध्ये गोपी यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक पसार झाला. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.