Lockdown : लॉकडाउन मध्ये घरी बसून वाढतंय वजन ? करा ‘या’ टिप्स फॉलो

मुंबई  :  पोलीसनामा ऑनलाइन –    सध्या संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे त्यामुळेच अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे घरी बसून अनेकांना वजन वाढीची समस्या भेडसावत आहे अशा वेळी घरात राहूनच वजनावर नियंत्रण मिळवायचे तरी कसे या विषयी जाणून घेउया सोप्या –

–  घरात राहून अनेकांच्या जेवणाच्या वेळासुद्धा बदल्या आहेत त्यामुळे अनेकांना वजन वाढीची समस्या सतावत आहे जेवणाच्या वेळ पाळली तर वजन वाढीवर आपण नियंत्रन मिळवू शकतो

  आरोग्य दायी स्नॅक्स खावे – अरबट चरबट स्नॅक्स चवीला छान लागत असले तरी ते जास्त प्रमाणात खाणे अपायकारक असतात त्यामुळेच आहारात स्नॅक्स म्हणून फळ,ड्रायफ्रूट्स,गाजर,उकडलेली अंडी यांचा खास करून समावेश करावा

–  भरपूर पाणी प्या- भरपूर पाणी पिणे हा वजन वाढीवर सर्वोत्तम पर्याय आहे त्यातल्या त्यात कोमट पाणी पिल्याने लवकरात लवकर वजन नियंत्रणात येते

व्यायाम –  लॉकडाउन मुळे अनेकांचे मॉर्निंग वॉकला जाणे तसेच जिमला जाणे, मोकळ्या हवेत जाऊन व्यायाम करणे बंद झाले आहे. सद्य स्तिथीत याला पर्याय म्हणून आपण घरातल्या घरात काही ऍक्टिव्हिटीज करून वजनावर नियंत्रण मिळवू शकतो जसेकी सूर्य नमस्कार,योगासने,दोरीच्या उड्या , नुसत्या उड्या मारणे या व्यायाम प्रकाराणे आपण आपले वजन नियंत्रणात ठेऊ शकतो

साखरेवर घाला आवर –  कोल्ड ड्रिंक्स मिल्क शेक्स ,चहा या सर्वांचा आती प्रमाणामुळे वजन झपाट्याने वाढू शकते दिवसभरात जास्तीत जास्त दोन चमचे साखर पोटात जाईल इतकेच गोङ पदार्थ खाणे गरजेचं असते त्याहून जास्त साखर शरीरात गेल्यास वजन वाढ होते त्यामुळे गोड पदार्थ कमी प्रमाणात खाणे योग्य आहे

पुरेशी झोप –  लॉक डाउन मुळे झोपेच्या वेळा देखील बदललेल्या आहेत अनेक जण रात्री उशिरा पर्यंत मोबाइल मध्ये डोळे घालून बसलेले दिसतात त्यामुळे अवेळी झोपणे अवेळी उठणे जागरण करणे यामुळे देखील वजन झपाट्याने वाढते म्हणूनच वजन नियंत्रणासाठी पुरेशी आणि योग्य प्रमाणात झोप गरजेची आहे

अशाप्रकारे योग्य काळजी घेऊन लॉकडाउन मध्ये देखील वजन नियंत्रणात ठेऊन स्वस्थ आणि निरोगी राहता येईल.