Lockdown in Maharashtra | राज्यात लॉकडाऊनचे संकेत?, अजित पवारांचं साताऱ्यात मोठे विधान

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Lockdown in Maharashtra | राज्यात कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या वाढत असताना ओमिक्रॉनचे रुग्णही (Omycron Covid Variant) वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून (Maharashtra Government) खबरदारीसाठी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई-पुणे पुन्हा हॉटस्पॉट (Mumbai-Pune Hotspot) होण्याची शक्यता असल्याने दोन्ही शहरांसाठी कडक नियमावली समोर येणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आणि मुख्यमंत्र्यांमध्ये (CM) झालेल्या बैठकीत या नियमावलीवर विचार करण्यात आला. यानंतर साताऱ्यातील दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. अजित पवार यांनी राज्यातील काही भागात लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. (Lockdown in Maharashtra)

राज्यातील 10 मंत्री आणि जवळपास 20 आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर आज (सोमवार) साताऱ्यात त्यांनी राज्यातील काही भागात लॉकडाऊन (Lockdown) करण्याचे संकेत दिले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली, तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल. या संदर्भात मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्याची अंमलबजावणी सर्व भागात केली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले. (Lockdown in Maharashtra)

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) रुग्णांची संख्या वाढल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांनीही लॉकडाऊन केले. देशातील अनेक राज्यात सध्या रात्रीची संचारबंदी सुरु आहे. दिल्ली, बंगळुरुत ही त्याची काटेकोर अंमलबजावणी होत आहे. कारण, जेवताना, चहा पाण्याच्या वेळेस आपण मास्क काढतो. एकमेकांच्या समोर येतो तेव्हा कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं होतो. त्यामुळे या गोळी टाळणं नितांत गरजेचं असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

Web Title : Lockdown in Maharashtra | satara ajit pawar speaks on lockdown in maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती; कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार; इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख, जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी