निर्दयी ! युवकाच्या गळया 40 किलोचा दगड बांधून गावभर फिरवलं

पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोनाच्या महासंकटात माणुसकीचे दर्शन होत असतानाच ग्रामस्थांनी एका युवकाला अमानुषपणे मारहाण करून त्याच्या गळ्यात 40 किलोचा दगड बांधून गावभर वरात काढल्याचा प्रकार उघडकीस आला. या युवकाला वाचवण्यासाठी एकही जण पुढे सरसावला नाही. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील बैतूलच्या भैंसदेही गावातील आहे. ग्रामस्थांच्या तावडीतून सुटत मारहाणीमुळे जखमी झालेल्या तरुणाने पोलीस स्थानक गाठले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाचे नाव नंदू चिल्हाते असून तो ढोलना गावचा रहिवासी आहे. ग्रामस्थांनी त्याचे म्हणणे ऐकून न घेता त्याला बेदम मारहाण केली. अमानुषणपे मारहाण करून त्याच्या गळ्यात 40 किलोचा दगड बांधून त्याला गावभर फिरवण्यात आले.

गावात असलेल्या पंचायतीमध्ये तात्पुरत्या स्वरुपात पंप ऑपरेट करण्याचे काम नंदू या युवकाकडे होते. त्याला काही कारणास्तव पंचायतीने कामावरून काढून टाकल्याने तो त्रस्त होता. त्याच दरम्यान नंदूला नोकरीवरून काढून टाकले तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत अशा आशयाचे पत्र गावकर्‍यांना मिळाले. . पत्रामुळे गावात अफवा पसरली आणि संतप्त ग्रामस्थांनी कोणताही विचार न करता नंदू नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केली. पत्राचा पाठपुरावा न करता आणि कोणतीही चौकशी न करता केलेल्या बेदम मारहाणीमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. मॉब लिंचिंगचा बळी होता होता युवक वाचला. त्यानं ग्रामस्थांच्या तावडीतून स्वत:ला सोडवून घेत थेट पोलीस स्थानक गाठून घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like