home page top 1

मला मुख्यमंत्री बनायला आवडेल : अजित पवार

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – राजकारणात येणाऱ्या प्रत्येकाचे एक स्वप्न असते. आपल्याला कारभार करता आला पाहिजे. निर्णय घेता आला पाहिजे. असे आम्हाला प्रत्येकाला वाटते. मला मुख्यमंत्री पदावर जायला निश्चितच आवडेल. पण फक्त मला आवडून चालणार नाही. आमच्या आघाडीने मॅजिक फिगर ओलांडली आणि जनतेने जर निवडून दिले तर ते शक्य आहे, असे म्हणत अजित पवार यांनी आपणही मुख्यमंत्री पदाच्या शर्य़तीत असल्याचे स्पष्ट केले.

बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. यावेळी मतदान करून बाहेर आल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर त्यांनी, सर्व जनतेने ज्यांच्या हातात ही ताकद दिली आहे, ज्यांच्या मतामध्ये तो अधिकार आहे. ते ठरवतील की मुख्यमंत्री कोण होणार. जे चांगले काम करतील, निवडून आलेल्या आमदारांचा विश्वास संपादन करतील, जनतेचा विश्वास जिंकतील. ते मुख्यमंत्री होतील. मी पण मुख्यमंत्री बनण्यासाठी प्रयत्न करेन. मला मुख्यमंत्री करायचे की नाही ते शेवटी जनताच ठरवेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणूक संपल्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकींच्या कामासाठी लागणार आहे. तसेच बारामती भाजपचा विजय झाल्यास आपण राजकारणामधून निवृत्ती घेऊ असं माजी उप-मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले आहे. बारामतीच्या काटेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

Loading...
You might also like