मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना तिहार कारागृहाची भिती दाखवत दमबाजीचा प्रकार केला : छगन भुजबळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – सीबीआय, ईडी व पोलीस अशा तपास यंत्रणाचा वापर विरोधकांना गप्प करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना वर्धा येथील प्रचार सभेतून तिहार कारागृहाची भिती दाखवत दमबाजीचा प्रकार केला आहे. असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हंटले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप सध्या उडाली आहे. झोप उडण्याचे कारण तिहार कारागृहात बंदिस्त आहे. तो चौकशीत सगळे काही बोलून गेला तर आपले काय होईल, याची भीती राष्ट्रवादीच्या नेत्यांना असल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली होती. या आरोपाचा समाचार घेताना भुजबळ यांनी हे वक्तव्य केले.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी, सीबीआय, ईडी अशा तपास यंत्रणांचा वापर विरोधक व प्रसार माध्यमांचा आवाज दाबण्यासाठी केला जात आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, पी. चिदंम्बरम यांच्यासह प्रसार माध्यमांच्या विरोधात या यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात गोध्रा प्रकारणात केसेस आहेत. न्यायाधीश लोया यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे, अशी प्रकरणे रिओपन होऊ शकतात. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सर्वात शक्तीशाली नेते असल्याने नरेंद्र मोदी यांनीही हे मान्य केले आहे. म्हणूनच त्यांना टार्गेट केले जात आहे. असे त्यांनी म्हंटले. याचबरोबर सीबीआय, ईडी व पोलीस अशा तपास यंत्रणाचा वापर विरोधकांना गप्प करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना वर्धा येथील प्रचार सभेतून तिहार कारागृहाची भिती दाखवत दमबाजीचा प्रकार केला आहे. असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, मात्र मोदी शेतकरी आत्महत्या, नोटाबंदी शंभर टक्के यशस्वी झाली का, दिलेल्या आश्वासना प्रमाणे दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार मिळाला का, आश्वासनानुसार प्रत्येका १५ लाख दिले का, देशातील दहशतवादाची समस्या, असे मुद्दे सोडून दुसऱ्याच्या घरात काय सुरू आहे. यात मोदी धन्यता मानत आहेत. असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर मोदी व शहा ही जोडी देशाच्या मुळावर उठली आहे. देशभरात केंद्र सरकारच्या विरोधात असंतोष आहे. निवडणुकीनंतर देशात सत्ता परिवर्तन होईल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like