साडीत कब्बडी खेळणारी खासदार विरोधकांना पराजित करणार का ? 

वडोदरा : वृत्तसंस्था – वडोदरा लोकसभा मतदार संघात साडीत कब्बडी खेळणारी खासदार निवडणुकीच्या रिंगणात विरोधकांना धूळ चारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या २० वर्षांपासून हा मतदार संघ भाजपच्या हातात आहे. त्यामुळे हा मतदार संघ भाजपासाठी महत्वाचा मानला जातो. भाजपच्या रंजनबेन धनंजय भट्ट या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. यामध्ये १६ राज्यातील ११७ मतदार संघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आज दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अमित शहा, राहुल गांधी, तसेच मुलायम सिंह यांच्यासमवेत अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे. मात्र हे दिग्गज नेते रिंगणात असले तरी जास्त चर्चा वडोदरा लोकसभा मतदार संघाची होत आहे. सध्या या मतदार संघातून भाजपच्या रंजनबेन धनंजय भट्ट या राज्यसभेच्या खासदार आहेत

या मतदार संघातून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या रिंगणात होते आणि आता या निवडणुकीत भाजपा कडून रंजनबेन धनंजय भट्ट निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, भाजपा खासदार सोबतच साडीत कब्बडी खेळणारी खासदार अशी देखील त्यांची ओळख आहे. त्यामुळे वडोदरा लोकसभा मतदार संघात साडीत कब्बडी खेळणारी खासदार निवडणुकीच्या रिंगणात विरोधकांना धूळ चारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लहान मुलांच्या एका कार्यक्रमा दरम्यान त्यांनी साडीवरच कब्बडी खेळली होती तेव्हा पासून त्यांची साडीत कब्बडी खेळणारी खासदार अशी ओळख तयार झाली आहे.