सोलापूर : आंबेडकर, शिंदे, महास्वामी या उमेदवारांची एवढी आहे संपत्ती

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – सोलापूर लोकसभा या राखीव मतदारसंघासाठी मोठी लढत होणार आहे. काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे ,भाजपचे डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य आणि बहुजन वंचित आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. त्यात आता प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सोलापूरच्या लढतीला चांगल रंग आला आहे.

काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने पदयात्रा काढून आपले अर्ज दाखल केले तर भाजपने हेरिटेज हॉल येथे बैठक घेऊन कार्यकर्त्यांची एकत्र मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये होणारी ही लढत प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी होणार आहे. या तिन्ही उमेदवारांच्या संपत्तीचे विवरण त्यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जसोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या संपत्तीचे विवरण

१. प्रकाश आंबेडकर
( प्रकाश आंबेडकर, पत्नी अंजली आंबेडकर आणि मुलगा सुजात आंबेडकर यांची एकत्रित मालमत्ता )
जंगम मालमत्ता
प्रकाश आंबेडकर – ₹४१ लाख ८१ हजार १८९
अंजली आंबेडकर – ₹७३ लाख ८६ हजार २७३
सुजात आंबेडकर – ₹९लाख ५५ हजार ४५४

स्थावर मालमत्ता
प्रकाश आंबेडकर – ₹३२ लाख
अंजली आंबेडकर – ₹ १ कोटी १५ लाख
संयुक्तिक स्थावर मालमत्ता ₹ ३ कोटी १५ लाख

तसेच प्रकाश आंबेडकर यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे कसलेही वाहन नाही. त्यांच्यावर कसल्याही प्रकारचे कर्ज नाही. तसेच त्यांचे फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडियावर खाती आहेत. त्याच प्रमाणे त्यांची स्वतःच्या नावाची वेबसाईट देखील आहे.

२. सुशीलकुमार शिंदे
(सुशीलकुमार शिंदे आणि पत्नी उज्वला शिंदे)

जंगम मालमत्ता
सुशीलकुमार शिंदे – ₹ ११ कोटी ३६ लाख ३१ हजार १२४
उज्वला शिंदे – ₹ ६ कोटी ५९ लाख १३ हजार २३७

स्थावर मालमत्ता
सुशीलकुमार शिंदे – ₹९ कोटी ९६ लाख ८८ हजार ०२१
उज्वला शिंदे – ₹ १० कोटी ११ लाख २६ हजार ३२१

सुशीलकुमार शिंदे यांच्या मालकीचे २ ट्रॅक्टर, १ फॉर्च्युनर कार आणि एक टेम्पो असे वाहने आहेत. तर सुशीलकुमार शिंदे यांच्यावर ३७ लाख ५० हजार रुपये कर्ज आहे. तर त्यांच्या पत्नी उज्वला शिंदे १० लाख रुपयांचे कर्ज आहे. तसेच सुशील कुमार शिंदे यांचे सोशल मीडियात कोणतेही खाते नाही.

३. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य मालमत्ता
(कुटुंबात कोणीही नाही)

जंगम मालमत्ता
₹ ६ लाख ४६हजार ०७९

स्थावर मालमत्ता
₹२ कोटी ७२ लाख २४ हजार

महास्वामी यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. विशेष म्हणजे त्यांच्या नावावर चार साखर कारखान्याचे शेअर आहेत. तसेच महास्वामी कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियात नाहीत.