‘अब की बार फिर एक बार मोदी सरकार’ ; सर्वच ‘EXIT POLL’चा अंदाज NDA @300

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ‘अब की बार फिर एक बार मोदी सरकार’ हे उत्‍तर मिळाले आहे सर्वच एक्झिट पोलमधून. राजकीय जाणकारांनी आणि विरोधकांनी शेवटपर्यंत मोदींची लाट नसल्याचे सांगितले. मात्र, यावेळी देखील मतदानात मोदींची लाट असल्याचे सर्व एक्झिट पोलवरून दिसून येत आहे. विविध वृत्‍तवाहिन्या आणि संस्थांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार भाजपप्रणित एनडीएलाच पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळत असून नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील अशी दाट शक्यता आहे. भाजपप्रणित एनडीएच सरकार पुन्हा सत्‍तेत येणार हे मात्र निश्‍चित.

लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील म्हणजेच 7 व्या टप्प्यातील मतदान आज (रविवार) पार पडले. त्यानंतर सर्वच वृत्‍त वाहिन्यांवर आणि वेगवेगळया संस्थांनी एक्झिट पोलचे अंदाज वर्तविण्यास सुरवात केली. रिपब्लिक टीव्ही आणि सीव्होटर यांनी केलेल्या सर्व्हेनुसार एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत दर्शविण्यात आले असुन एनडीएच सत्‍ता स्थापन करेल असे चित्र पहावयास मिळत आहे.

असा आहे रिपब्लिक आणि सीव्होटरचा अंदाज 
भाजप प्रणित एनडीए : 287
काँग्रेस प्रणित यूपीए: 128
महागठबंधन : 40
इतर पक्ष : 87

टाईम्स नाऊ – व्हीएमआर यांचा एक्झिट पोल
भाजप प्रणित एनडीए : 306
काँग्रेस प्रणित यूपीए : 132
इतर पक्ष : 104

इंडिया टीव्हीच्या सर्वेक्षणानुसार
भाजप प्रणित एनडीए : 298
काँग्रेस प्रणित यूपीए : 118
इतर पक्ष : 126

एनडीटीव्हीच्या एक्झिट पोलनुसार
भाजप प्रणित एनडीए : 300
काँग्रेस प्रणित यूपीए : 127
इतर पक्ष : 115

एबीपीच्या एक्झिट पोलनुसार
भाजप प्रणित एनडीए : 336
काँग्रेस प्रणित यूपीए : 55
इतर पक्ष : 148