वजन कमी करायचंय ? हा डाएट प्लॅन फॉलो करा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वजन कमी करण्यासाठी सात दिवस हा डाएट प्लॅन फॉलो करा. त्यामुळे ३ किलो वजन कमी करणं शक्य होईल. सात दिवसांपर्यंत एकाच प्रकारचा डाएट प्लॅन फॉलो केल्यामुळे कंटाळा येतो. त्यामुळे दोन प्रकारचे डाएट प्लॅन फॉलो करू शकता. पहिल्या प्लॅनप्रमाणे सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे पोट साफ होण्यासोबतच चरबी कमी करण्यासाठी मदत होइल. नाश्त्या मध्ये एक ग्लास दूध आणि दोन टेबलस्पून ओट्स किंवा कॉर्नफ्लॅक्स खावेत. दुपारच्या जेवणामध्ये दोन छोट्या वाट्या भाज्या असलेला दलिया खा. भाज्या आणि दलियामध्ये अस्तित्वात असणारं फायबर खाल्याने पोट बराच वेळ भरल्याप्रमाणे वाटते.

चहा पिण्याची इच्छा झाली तर ग्रीन टी प्यावे. रात्रीच्या जेवणामध्ये दूध आणि दलिया खाऊ शकता. तर दुसरा प्लॅन असा आहे, दिवसाची सुरूवात एक ग्लास पाण्याने करा. त्यानंतर तुम्ही गरम ब्लॅक टी किंवा ग्रीन टी घेऊ शकता. नाश्त्यामध्ये मोठा बाउलमधये सूप पिउ शकता ज्यामध्ये भाज्या असतील. दुपारच्या जेवणामध्ये व्हिट ब्रेडच्या दोन स्लाइस खा. त्यासोबत एक कप सूप घेऊ शकता. संध्याकाळी ग्रीन टी पिउ शकता. चहा किंवा कॉफ शक्यतो अवॉइड करा. रात्रीच्या जेवणामध्ये भाज्यांपासून तयार करण्यात आलेलं सॅन्डविच खा. ब्रेड ओट्स किंवा व्हिट ब्रेड असेल तर उत्तम ठरतं. हा डाएट प्लॅन फॉलो करण्यासाठी दररोज जवळपास ३० मिनिटांसाठी व्यायाम करा. ब्रेकफास्ट अजिबात स्किप करू नका. तसेच कोणत्याही पदार्थामध्ये साखरेचा जास्त वापर करणं टाळा. या दोन पैकी कोणताही प्लॅन फॉलो करताना आहार तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.