काय सांगता ! होय, जालन्यात मारहाण झालेल्या ‘त्या’ प्रेमी युगुलानं केलं ‘लग्न’

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन – जालना जिल्ह्यातील गोंदेगाव येथे बुलडाणा जिल्ह्यातील प्रेमी युगुलास टोळक्याने मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. या टोळक्याने दोघांना मारहाण करून मुलीचा विनयभंग केला होता. या घटनेची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन चौघांना अटक केली होती. आता या जोडप्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रेमी युगुलाने लग्न केल्याची माहिती समोर आली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील एक प्रेमीयुगुल हे जालना जिल्ह्यात फिरायला गेले होते. त्यावेळी गोंदेगाव येथील काही तरुणांनी या प्रेमीयुगुलाची छेड काढत बेदम मारहाण केली होती. एवढेच नाही तर या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या घटनने सर्वच स्तरातून रोष व्यक्त करण्यात आला. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी या प्रकरणी सर्व आरोपींचा शोध घेऊन अटक केली होती. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

सोशल मीडियावर व्हायरल हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आता या प्रेमीयुगुलाने सोमवारी मेहूना राजा येथे मंदिरात लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियीवर व्हायरल होत आहेत. पीडित मुलगा-मुलगी ही देऊळगाव राजा तालुक्यातील असून मुलगी ही फार्मसी कॉलेजला प्रथम वर्षाला शिकत आहे. तर मुलगा हा अकोला येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like