2.66 कोटी लोकांना ‘एकदम’ फ्री मिळणार गॅस सिलेंडर, तुम्हाला देखील हवंय तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरच केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना’ (PMGKY) अंतर्गत 1.7 लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले. अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या या मदत पॅकेजमध्ये गरीब वर्गासाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. त्यापैकी एक म्हणजे ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’ अंतर्गत गरीब महिलांना पुढील तीन महिने विनामूल्य एलपीजी सिलिंडर मोफत देणे. गुरुवारी वित्त मंत्रालयाने माहिती दिली की उज्ज्वला योजनेंतर्गत आतापर्यंत 2.6 कोटी गरजू महिलांना एलपीजी सिलिंडर विनामूल्य देण्यात आले आहेत. तसेच सध्याला 3.05 कोटी सिलिंडर बुक केले गेले आहेत.

या योजनेंतर्गत आतापर्यंतची स्थिती काय आहे, याबाबत पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत करण्यात आलेल्या घोषणांची माहिती वित्त मंत्रालयाने गुरुवारी दिली. त्यात म्हटले आहे की 22 एप्रिल 2020 पर्यंत उज्ज्वला योजनेंतर्गत एकूण 2 कोटी 66 लाख मोफत एलपीजी सिलिंडर प्रदान करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत उज्ज्वला योजनेंतर्गत तुम्हालाही एलपीजी सिलिंडर विनामूल्य मिळवायचे असतील तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. त्याबाबत जाणून घेऊया …

मोबाइल नंबर नोंदवावा लागेल

एलपीजी सिलिंडर घेण्यासाठी ग्राहकांच्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या लाभार्थ्यांचा मोबाइल नंबर गॅस एजन्सीकडे नोंदणीकृत आहे, केवळ त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल.

एका महिन्यात किती सिलिंडर मिळतील

उज्ज्वला योजनेनुसार 14.2 किलोचे फक्त 3 एलपीजी सिलिंडर ही प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत देण्यात येणार आहेत. 1 महिन्यात फक्त एक सिलिंडर विनामूल्य दिले जाईल. ज्यांचे 5 किलोचे सिलिंडर आहेत त्यांना 3 महिन्यांत एकूण 8 सिलिंडर दिले जातील. म्हणजेच एका महिन्यात जास्तीत जास्त 3 सिलिंडर्स विनामूल्य असतील.

विना अनुदानित सिलिंडरच्या किमतीत कपात

अलीकडेच सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत कमी केली आहे. दिल्लीत 14.2 किलो विना सबसिडी सिलिंडरची किंमत आता 744 रुपये झाली आहे. यापूर्वी दिल्लीत एक सिलिंडर 805.50 रुपयांना मिळत होते. अशा प्रकारे 14.2 किलो सिलिंडरची किंमत सुमारे 61.50 रुपयांनी कमी झाली आहे.